Ayodhya Ram Mandir : न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

राम मंदिराचा बहुप्रतिक्षित 'प्राणप्रतिष्ठापना सोहळा देशातील सर्व राज्यांमध्ये हा जाहीरपणे दाखविणार आहेच मात्र या प्रसारणाव्यतिरिक्त,न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम स्क्वेअरवर देखील थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

268
Ayodhya Ram Mandir : न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

अयोध्या येथील राम मंदिरामध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातच नाही तर परदेशातही जोरदार तयारी सुरू आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर ( New York Times Square) या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. जगभरातील विविध भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्येही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.(Ayodhya Ram Mandir )

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी सोहळ्याच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि समारंभादरम्यान पाळल्या जाणाऱ्या विधी आणि नियमांची तपशीलवार माहिती देखील घेतली आहे. भारतीय जनता पक्षानेही (भाजप) देशभरातील बूथ स्तरावर हा सोहळा थेट प्रसारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत.२२ जानेवारी२०२४ रोजी रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होतील. राम मंदिरातील मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८सेकंद ते १२. ३० मिनिटे २०सेकंद असेल. प्राण प्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांसाठी प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त असेल.(Ayodhya Ram Mandir )

(हेही वाचा : Narayan Rane : कोकणात यायचं, मासे खायचं आणि जायचं एवढंच काम त्यांनी केलं ; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका)

अशी आहे गर्भगृहाची रचना
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, विष्णूची आठ दिशा, आठ भुजा आणि आठ रूपे लक्षात घेऊन गर्भगृह अष्टकोनी करण्यात आले आहे. गर्भगृह अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की भक्तांना त्यांच्या मूर्तीची प्रतिमा २५ फूट अंतरावरूनही पाहता येईल. राम मंदिरात विष्णूच्या दशावतारामध्ये ,६४ योगिनी, ५२ शक्तिपीठ आणि सूर्याची१२ रूपे कोरलेली आहेत. प्रत्येक खांबावर १६-१६ मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरात असे एकूण २५० खांब आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.