Himanshi Shelat : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या हिमांशी शेलत

१९७८ मध्ये त्यांनी सात पगठिया अंधारा कूवामा ही पहिली कथा लिहिली आणि नवनीत या गुजराती मासिकात प्रकाशित झाली. नंतर भावनगर येथून प्रकाशित होणाऱ्या मिलाप या मासिकात ही कथा सर्वोत्कृष्ट लघुकथा म्हणून प्रकाशित झाली.

213
Himanshi Shelat : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या हिमांशी शेलत
Himanshi Shelat : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या हिमांशी शेलत

हिमांशी शेलत (Himanshi Shelat) यांचा जन्म ८ जानेवारी १९४७ रोजी सुरत येथे झाला. त्यांनी १९६६ मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स आणि १९६८ मध्ये मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. १९८२ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. पुढे त्या कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य शिकवू लागल्या. त्याचबरोबर त्यांनी २०१३-२०१७ दरम्यान साहित्य अकादमीमध्ये सल्लागार मंडळात सदस्य म्हणून काम केले आहे.

१९७८ मध्ये त्यांनी सात पगठिया अंधारा कूवामा ही पहिली कथा लिहिली आणि नवनीत या गुजराती मासिकात प्रकाशित झाली. नंतर भावनगर येथून प्रकाशित होणाऱ्या मिलाप या मासिकात ही कथा सर्वोत्कृष्ट लघुकथा म्हणून प्रकाशित झाली. मराठी लेखक जयवंत दळवी हे त्यांचे आदर्श… अंतराल हा त्यांचा पहिला लघु कथासंग्रह १९८७ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर अंधारी गलिमा सफेद तपका, ए लोको, सांजनो समय, पंचवाक्य अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation: मनोरंजन मैदान आणि क्रीडांगणे दत्तक तत्त्वावरील धोरणाला विरोध का?)

प्लॅटफॉर्म नंबर ४ आणि व्हिक्टर हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक. परवास्तववाद हा त्यांचा साहित्यिक समीक्षणात्मक ग्रंथ आहे. आठमो रंग, क्यारीमा आकाश पुष्पा अने कला पतंगिया आणि सप्तधारा या त्यांनी लोहिलेल्या कादंबऱ्या आहेत. तर एकादनी चकलीओ आणि दाबे हाथे हे त्यांचे निबंध संग्रह आहेत. अंधारी गलिमा सफेद तपकन या लघुकथा संग्रहासाठी त्यांना १९९६ मध्ये गुजराती भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याच पुस्तकाला गुजराती साहित्य परिषदेचे पारितोषिकही मिळाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.