बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पाचव्यांदा सत्ता मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बांगलादेश अवामी लीग या पक्षाला रविवारी झालेल्या १२ व्या संसदीय सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या निडणुकीत शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या पक्षाला ३०० पैकी २०० जागांवर विजय मिळाला आहे. तर शेख हसीना यांना २ लाख ४९ हजार ४९६ मतांनी विजय मिळवला आहे. (Bangladesh Election 2024 )
बांग्लादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पाचव्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगनं ३०० जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. २००९ पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी १९९१ ते १९९६ या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या. ९ Bangladesh Election 2024 )
(हेही वाचा : Boycott Maldives : ‘बॉयकॉट मालदीव्ज’ ट्रेंड काय आहे, खरंच भारतीय मालदीव्जचं बुकिंग रद्द करत आहेत का?)
पंतप्रधान शेख हसीना यांनी गोपाळगंज-3 मतदारसंघातून विजय मिळवला आहे. खासदार म्हणून त्यांची ही आठवी टर्म असेल. आता पर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगन ३०० संसदीय जागांपैकी २२४ जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत, तर अपक्षांनी ६२ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागांसाठी अजून मतमोजणी सुरु आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community