पाकिस्तानमधील सुन्नी उलेमा कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि आपल्या हिंदूविरोधी भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या मौलाना मसूद उर रहमान उस्मानीची अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे.त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (Maulana firing)
पाकिस्तानच्या राजधानी इस्लामबाद मध्ये राहणारे मौलाना मसूद-उर-रहमान उस्मानी हे भारत आणि हिंदू धर्मियांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी नेहमीच वादात होता. यासोबत ते अधून-मधून शिया मुस्लिमांविरोधात सुद्ध गरळ ओकायचा.(Maulana firing)
#Islamabad
Cctv footage of target killers who martyred religious scholar Masood ur Rehman usmani sb..#Pakistan #terrorism pic.twitter.com/yDOzfiIC8s— shahmir khan (@shahmir52_khan) January 5, 2024
(हेही वाचा : Bangladesh Election 2024 : शेख हसीना यांचा दणदणीत विजय; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार)
ज्यामध्ये बाईकस्वारांनी भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. इस्लामाबादमधील मौलाना मसूद रहमान उर उस्मानी यांच्या हत्येत दोन ते तीन दुचाकींचा वापर करण्यात आला होता. यामध्ये मारेकरी त्यांनी तोंडाला मास्क घातलेले आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ते उस्मानीला गोळ्या घालतात आणि तिथून निघून जातात. असे चित्र सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे . या हत्याकांडाने पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांची भीती निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community