- ऋजुता लुकतुके
भारतीय महिलांना दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. तर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे. भारतासाठी आघाडीच्या फलंदाजांचं अपयश पुन्हा उठून दिसलं. एकट्या दीप्ती शर्माने बॅट आणि चेंडूसह लढत देण्याचा प्रयत्न केला. तर हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद झाली. (Ind W vs Aus W 2nd T20)
नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. पण, स्मृती मंढाना (२३) आणि जेमिमा रॉडरिग्ज (१३) यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेता आला नाही. तर शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर स्वस्तात बाद झाली. अखेर ऋचा घोषच्या २३ आणि दीप्ती शर्माच्या ३० धावांमुळे भारताने निदान १३० धावसंख्या गाठली. (Ind W vs Aus W 2nd T20)
Australia win the 2nd T20I by 6 wickets and level the series 1⃣-1⃣
It all comes down to the decider on Tuesday 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/ar0sCktbHa#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kC1TjtUtKn
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
(हेही वाचा – Bilkis Bano Case : ‘ते’ ११ आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार, सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला अल्टिमेटम)
यासाठी हरमनप्रीतने चार गोलंदाज वापरले
याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघासाठी एलिसा हिली आणि बेथ मूली यांनी सुरुवातच तगडी आणि वेगवान करून दिली. दोघींनी आठव्या षटकातच संघाचं अर्धशतक फलकावर लावलं. त्यानंतर ताहिला मॅग्राने १९ तर एलिसा पेरीने नाबाद ३४ धावा करत संघाला विजयाच्या समीप आणलं. (Ind W vs Aus W 2nd T20)
ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यासाठी भारतीय कर्णधार हरमनप्रीतने चार गोलंदाज वापरले. शेवटी दीप्तीने दोघींना बाद करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दीप्तीने आपल्या ४ षटकांत २२ धावा देत २ बळी टिपले. तिच्या अष्टपैलू कामगिरीनंतरही भारताला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (Ind W vs Aus W 2nd T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community