- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) रविवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मुंबईत त्याच्या घरी परतला. शेवटच्या केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. त्यामुळे भारतीय संघासाठी नवीन वर्षाची सुरुवात विजयाने झाली आहे. आणि या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) ४ डावांत १७२ धावा करून भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli)
तर केपटाऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात कमी वेळ चाललेली कसोटी ठरली. कसोटीत चारही डाव मिळून ६४२ चेंडू टाकले गेले. रविवारी विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला तेव्हा चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. आणि स्वाक्षरीसाठी चाहत्यांनी त्याच्या भोवती गर्दीही केली होती. (Virat Kohli)
(हेही वाचा – Ind W vs Aus W 2nd T20 : भारतीय महिलांचा ६ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाची मालिकेत १-१ अशी बरोबरी)
Virat Kohli has reached India after the South Africa tour. pic.twitter.com/m10RMAb9Ld
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 7, 2024
विराटनेही (Virat Kohli) वेळात वेळ काढून चाहत्यांच्या सेल्फी काढण्याच्या विनंतीला मान दिला. यंदा विराटचं आयसीसी (ICC) सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. विराटला हा पुरस्कार मिळाला तर मानाच्या सर गारफिल्ड सोबर्स करंडकाचा तो तिसऱ्यांदा मानकरी ठरेल. (Virat Kohli)
तसंही विक्रमांच्या दृष्टीने विराटसाठी २०२३ हे वर्ष चांगलं गेलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ आंतरराष्ट्रीय शतकं झळकवण्याचा विक्रम यंदा त्याने केला आहे. (Virat Kohli)
हेही पहा –