- ऋजुता लुकतुके
मोठ्या आशेनं पुन्हा एकदा व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन केलेल्या राफेल नदालला (Rafael Nadal) अखेर ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घ्यावी लागली आहे. ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत उपउपान्त्य फेरीचा सामना खेळताना त्याला जॉर्डन थॉमसन विरुद्ध तीन सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. या सामन्यात त्याने दुसऱ्या सेटमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेतला होता. ती दुखापत साधी नसल्याचं आता समोर आलं आहे. त्याच्या दुखऱ्या पायातील एक स्नायू पुन्हा एकदा दुखावला आहे. (Rafael Nadal)
अखेर पुनरागमनाच्या एका आठवड्यातच नदालला (Rafael Nadal) पुन्हा दुखापतीसाठी ब्रेक घ्यावा लागणार आहे. (Rafael Nadal)
Hi all, during my last match in Brisbane I had a small problem on a muscle that as you know made me worried. Once I got to Melbourne I have had the chance to make an MRI and I have micro tear on a muscle, not in the same part where I had the injury and that’s good news.
Right… pic.twitter.com/WpApfzjf3C— Rafa Nadal (@RafaelNadal) January 7, 2024
(हेही वाचा – Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला ‘हा’ खर्च)
५ सेटचे सामने सध्या मी खेळू शकत नाही – नदाल
‘मी ब्रिस्बेनमध्ये खेळत असताना माझ्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. आता मेलबर्नला आल्यावर मला एमआरआय (MRI) करून घेण्यासाठी उसंत मिळाली. एमआरआय (MRI) स्नायूमध्ये छोटी चिर गेल्याचं दाखवत आहे. नशिबाने आधीच दुखऱ्या असलेल्या ठिकाणी ही चिर नाही. पण, त्यामुळे ५ सेटचे सामने सध्या मी खेळू शकत नाही. मी स्पेनला परत निघालो आहे. आणि डॉक्टरांना भेटणार आहे,’ असं नदालने आपल्या ट्विटरवीर संदेशात लिहिलं आहे. (Rafael Nadal)
नदालने (Rafael Nadal) यापूर्वी २००९ आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. आणि आताही ही स्पर्धा खेळायला तो उत्सुक होता. या ताज्या दुखापतीनंतरही नदालने लवकरात लवकर टेनिस कोर्टवर परतण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. (Rafael Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community