कलर्स मराठीवर (Colors Marathi) चालू असलेल्या ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील दृश्यांवरून सध्या दर्शक आणि स्वामीभक्त यांच्यामध्ये संताप पहायला मिळत आहे. या मालिकेत स्वामी समर्थांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. (secular tv serials)
धर्मनिरपेक्ष दाखविण्यासाठी स्वामी भक्तांना दृष्टांत देतांना अनेकदा मौलवीच्या वेषात दाखवले जाते. शनिवार, ६ जानेवारी २०२४ च्या भागात, काशीला गेलेल्या एका दांपत्याला स्वामींनी पुन्हा मौलवीच्या स्वरूपात दर्शन दिले आहे. सध्या चालू असलेल्या भागांमध्ये रामाचार्य या पात्राला कर्मठ ब्राह्मण दाखवून समाजामध्ये ब्राह्मणांविरुद्ध जातीय विद्वेषी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे स्वामीभक्तांचे म्हणणे आहे. (Jay Jay Swami Samarth)
(हेही वाचा – Mumbai Police दलात कथित आरोपांच्या लेटरबॉम्बने उडवली खळबळ)
दिग्दर्शकांना मुस्लिमांचा एवढा पुळका का ?
श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी आहेत. भगवान दत्तात्रेय हे सनातन हिंदु धर्मातील आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्त आणि स्वामीभक्त मोठ्या प्रमाणात आहेत. असे असतांना ‘दिग्दर्शकांना मुस्लिमांचा एवढा पुळका का आहे ?’, अशा शब्दांत स्वामीभक्तांनी दिग्दर्शकांना खडसावले आहे. ‘पाटील’ नावाच्या एका X अकाऊंटवर याविषयी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेक स्वामीभक्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
श्री स्वामी समर्थ🚩🙏
कलर्स मराठीवर स्वामी समर्थांची मालिका सुरु आहे.
या मालिकेत सुरूवातीपासुन स्वामींची प्रतिमा काहीही कारण नसताना धर्मनिरपेक्ष दाखविण्यासाठी त्यांना अनेकदा दृष्टांत देताना मौलवीच्या वेषात दाखविले जाते.
याचे काय कारण आहे!??
श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी आहेत.… pic.twitter.com/ooG3j7qJf9— पाटील™ (@patilji_speaks) January 6, 2024
कारवाईची मागणी
पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतरही नेत्यांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.
एका ट्विटर वापरकर्त्याने चित्रा वाघ यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. Ritesh_tweeting यांनी म्हटले आहे की, स्वामी समर्थांच्या प्रती आपली श्रद्धा ज्ञात आहे, तरी त्यांच्या होणाऱ्या अशा अपप्रचाराबाबत जागृती होणे आणि हे थांबणे गरजेचे आहे.
@ChitraKWagh स्वामी समर्थांच्या प्रती आपली श्रद्धा ज्ञात आहे, तरी त्यांच्या होणाऱ्या अशा अपप्रचाराबाबत जागृती होणे आणि हे थांबणे गरजेचे आहे.
कृपया दखल घ्यावी..🙏
— 🌄 (@Ritesh_tweeting) January 6, 2024
मोजून दहा मुस्लिम प्रेक्षकही ही मालिका पहात नसतील !
‘क्या सच क्या झूठ?’ या वापरकर्त्याने म्हटले आहे की, ”खर तर मोजून दहा मुस्लिम प्रेक्षक ही हिंदू देव देवतांच्या मालिका पहात नसतील, पण तरीही हे असले प्रकार का करतात कळत नाही !!
हिंदू मनात सर्वधर्म समभावची बीजे रोवायची आणि इतर धर्मीय कट्टरतेने हिंदू ना प्रत्येक बाबतीत विरोध करतात, हिंदूच्या आस्था, श्रध्दा पूजा पद्धती समूळ नष्ट करतात !”
खर तर मोजून दहा मुस्लिम प्रेक्षक ही हिंदू देव देवतांच्या मालिका पहात नसतील, पण तरीही हे असले प्रकार का करतात कळत नाही !!
हिंदू मनात सर्वधर्म समभाव ची बीजे रोवायची आणि इतर धर्मीय कट्टर तेने हिंदू ना प्रत्येक बाबतीत विरोध करतात, हिंदूच्या आस्था, श्रध्दा पूजा पद्धती समूळ नष्ट करतात!— क्या सच क्या झूठ? (@icelife1979) January 7, 2024
मालिका दाखवण्यावर बंदी घाला
कपिल जाधव या ट्विटर वापरकर्त्यानेही याविषयी मागण्या केल्या आहेत. जाधव यांनी म्हटले आहे की, मोठा आर्थिक व कायदेशिर फटका पडल्या शिवाय ही मंडळी सुधारणार नाहीत. सर्व प्रथम मालिका दाखवण्या वर बंदी आणावी ( म्हणजे केलेला खर्च गळ्यात)
– जे दाखवलय ते तर्कसंगत सिद्ध करा (कारण स्वामी व प्रसिध्द साधु संतांवर दाखवलय, ज्यात लोकांची आस्था ) अन्यथा थेट फसवणुक कायदेशीर कारवाई.
मोठा आर्थिक व कायदेशिर फटका पडल्या शिवाय ही मंडळी सुधारणार नाहीत
– सर्व प्रथम मालिका दाखवण्या वर बंदी आणावी ( म्हणजे केलेला खर्च गळ्यात)
– जे दाखवलय ते तर्कसंगत सीध्द करा ( कारण स्वामी व प्रसिध्द साधु संतांवर दाखवलय, ज्यात लोकांची आस्था ) अन्यथा थेट फसवणुक कायदेशीर कारवाई
— 🚩कपिल जाधव (@KapilRavindraJ1) January 8, 2024
अनेक हिंदू याविषयी संताप व्यक्त करत आहेत. (Jay Jay Swami Samarth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community