मुंबई पोलीस दलात (Mumbai Police Force) व्हायरल झालेल्या पत्राने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडवून दिली आहे. मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) वरिष्ठ दर्जाच्या अधिकारी यांच्यावर या पत्रात कथित घाणेरडे आरोप लावण्यात आले आहे. ८ महिला कॉन्स्टेबलच्या सह्यांचे हे पत्र व्हायरल करण्यात आले असले तरी हे पत्र बोगस असून त्यांच्यावरील सह्या देखील बनावट असल्याचे मुंबई पोलीस दलाचे (Mumbai Police Force) विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले आहे. काही समाजकंटका कडून पोलीस अधिकारी यांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी हे कथित पत्र व्हायरल करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोकिसकडून देण्यात आली आहे. (Mumbai Police)
या व्हायरल पत्राची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू करण्यात येत असून हे पत्र व्हायरल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखा तसेच मुंबई गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईल फोनवर हे कथित पत्र शुक्रवार पासून प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या कथित पत्रात मुंबई पोलीस दलाच्या (Mumbai Police Force) मोटार परिवहन विभागातील ८ महिला कॉन्स्टेबल यांनी पोलिस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पुरुष कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Mumbai Police)
खालच्या थराचे आरोप
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि मुंबईतील सह पोलीस आयुक्त यांना हे पत्र पोस्टाने पाठवण्यात आल्याची प्रत समाज माध्यमावर तसेच पोलीस दलात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित पत्रात आठ महिला पोलीस कॉन्स्टेबलची नावे आणि सह्या करण्यात आलेल्या आहेत. या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे दोन पोलीस निरीक्षक यांच्यावर अगदी खालच्या थराचे आरोप करण्यात आले आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा – Rafael Nadal : नदालची अखेर ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार)
या व्हायरल कथित पत्राची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी यांनी पत्रात नमूद महिला कॉन्स्टेबल यांच्याकडे या कथित पत्राबाबत चौकशी केली असता हे पत्र बनावट असून महिला कॉन्स्टेबल यांच्या नावपुढील सह्या देखील बोगस असल्याचे समोर आले आहे. ज्या महिला कॉन्स्टेबलच्या नावांनी हे कथित पत्र लिहण्यात आले आहे, त्या प्रत्येकाकडे चौकशी करण्यात आली असून असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे समोर आले आहे. हे कथित पत्र कोणी लिहले व व्हायरल करण्यामागचा त्याचा हेतू काय याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे आणि गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलेला आहे. (Mumbai Police)
काय म्हटले पोलिसांनी…
व्हायरल कथित पत्राची आम्ही सखोल माहिती घेतली असता त्यातील कथीत अर्जदारांकडे चौकशी करण्यात आली, सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व बोगस सहीचा वापर करून कोणीतरी खोडसाळपणा करून जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आले आहे. व्हायरल पत्रातील माहिती ही पूर्णपणे चुकीची आहे. अर्जात करण्यात आलेल्या नमूद करण्यात आलेला कुठलाही प्रकार मुंबई पोलीस दलात घडलेला नाही. खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेवून त्याचे विरूध्द योग्य ती कायदेशी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community