Gautam Adani Back on Top : मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

जागतिक श्रीमंतांच्या यादीत आता गौतम अदानी बाराव्या तर मुकेश अंबानी तेराव्या स्थानावर आहेत. 

209
Gautam Adani Back on Top : मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani Back on Top : मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
  • ऋजुता लुकतुके

मागच्या महिनाभरात शेअर बाजारातील (Stock market) तेजीमुळे अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मुकेश अंबानींना मागे सारून भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान परत मिळवला आहे. ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार आता गौतम अदानी जागतिक स्तरावर बाराव्या तर मुकेश अंबानी तेराव्या स्थानावर आहेत. (Gautam Adani Back on Top)

डिसेंबर २०२३ मध्ये अदानी पहिल्या पंधरा जणांमध्ये परतले होते. गौतम अदानींची (Gautam Adani) एकूण मालमत्ता ९७.६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. २०२४ वर्ष सुरू झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत १३ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. २०२२ मध्ये हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी उद्योगसमुहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तुफान घसरण झाली होती. आणि त्यामुळे शेअरचं मूल्य कमी होऊन अदानी यांची श्रीमंतांच्या यादीत पहिल्या विसातूनही गच्छंती झाली होती. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी यांची संपत्ती तब्बल ६० टक्क्यांनी कमी झाली. (Gautam Adani Back on Top)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला तो क्षण)

अदानी यांच्या मिळकतीचे स्तोत

गौतम अदानी (Gautam Adani) हे पहिल्या पिढीचे उद्योजक असून अदानी समुहाचे संस्थापक आहेत. त्यांचा समुह हा खासकरून पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रात कार्यरत आहे. देशातील सगळ्या मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी, विमानतळ देखभाल आणि उभारणी करणारी कंपनी, असा त्यांच्या कंपनीचा लौकीक आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर, अदानी ग्रिन, अंबुजा सिमेंट अशा समुहातील सहा कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. (Gautam Adani Back on Top)

अदानी एंटरप्रायजेस (Adani Enterprises) या कंपनीच्या मुख्य कंपनीचा शेअर २०१४ मध्ये ४५० ते ५०० च्या आसपास होता. तो २०२२ पर्यंत तब्बल ३००० रुपयांपर्यंत पोहोचला. आणि तिथेच गौतम अदानी यांची भरभराट झाली. अदानी यांची संपत्ती मुख्यत्वे त्यांच्या शेअर बाजारातील बाजारमूल्यातूनच येते. (Gautam Adani Back on Top)

गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी वगळता, शापूर मिस्त्री आणि शिव नादर हे आणखी दोन भारतीय पहिल्या पन्नासांत आहेत. मिस्त्री ३८व्या तर नादर ४५ व्या स्थानावर आहेत. (Gautam Adani Back on Top)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.