स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित अभिनेता रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त अंदमान-निकोबार बेटाचे सौंदर्य पाहून थक्क झालो, असे अभिनेता रणदीप हुडा याने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया ‘X’वर लिहिले आहे. वीर सावरकर यांना अंदमान येथील सेल्युलर तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. चित्रपटातील या दृष्याच्या चित्रीकरणानिमित्त या स्थळांना भेट देता आली, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याने त्यांच्या अधिकृत ट्विवटर ‘X’वर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, ‘भारत देश खूप सुंदर असून निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचे प्राचीन सौंदर्य आणि समृद्ध इतिहास पाहून थक्क झालो. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रत्यक्ष त्यांची भूमिका साकारताना या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळाली. त्यावेळी वीर सावरकर यांच्या जीवनातील ‘काळे पाणी’ या अध्यायाचे चित्रीकरण करण्यासाठी अंदमान निकोबर बेटांना भेट दिली. या स्थळांना भेट नक्की द्यायलाच हवी.’
पोस्ट लिहून त्याने अंदमान-निकोबार येथील निसर्स सौंदर्याचे महत्त्व सांगणारी काही छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रे’त सहभाग…
१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातून मुक्तता झाली. या घटनेला शनिवारी, ६ जानेवारी २०२४ला १०० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिनाचे औचित्त्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’निमित्त पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेला अभिनेता रणदीप हुडा हिरवा झेंडा दाखवून यात्रेत सहभागी झाला होता.
Join Our WhatsApp CommunityIndia is so beautiful.
Was over awed by the pristine beauty and the rich history of Andaman and Nicobar Islands while shooting the Kalapani chapter of Veer Savarkar’s life .. a must visit. #ExploreIndianIslands pic.twitter.com/BLb4d8niOd— Randeep Hooda (@RandeepHooda) January 7, 2024