David Warner : डेव्हिड वॉर्नरला निवृत्तीनंतरही कसली आहे महत्त्वाकांक्षा?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला डेव्हिड वॉर्नर आता कोचिंगवर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

203
David Warner : डेव्हिड वॉर्नरची विराट कोहली आणि रॉस टेलरच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
David Warner : डेव्हिड वॉर्नरची विराट कोहली आणि रॉस टेलरच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

गेल्या आठवड्यात क्रिकेटमधील गाजलेली घटना म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि भारता दरम्यानची दोन दिवस चाललेली कसोटी आणि डेव्हिड वॉर्नरची (David Warner) क्रिकेटमधून निवृत्ती. मागच्या शनिवारी मेलबर्नला वॉर्नर आपल्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी खेळला. आता काही दिवस तो टी-२० लीगवर लक्ष केंद्रीत करणार आहे. बिग बॅश तसंच आयपीएलमध्ये खेळण्याइतकं क्रिकेट आपल्यात बाकी आहे, असं त्याने निवृत्तीपूर्वीच म्हटलं होतं. (David Warner)

आणि लीग क्रिकेटनंतरही वॉर्नरला (David Warner) क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा नाही. त्याला क्रिकेट प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. ‘टी-२० क्रिकेट मी काही दिवस खेळत राहणार आहे. आणि त्यानंतर मला प्रशिक्षक व्हायचं आहे. पण, आधी पत्नीला विचारावं लागेल. आणखी काही वर्ष कुटुंबापासून लांब रहायचं तर तिची परवानगी लागेल,’ असं वॉर्नरने फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितलं. (David Warner)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला तो क्षण)

वॉर्नरने दिली ही कबुली 

मैदानावर आक्रमक आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अखिलाडू वागणूक देण्याचा आरोप वॉर्नरवर अनेकदा झाला आहे. २०१८ च्या चेंडू कुरतडण्याच्या आरोपासाठी तर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय बंदीची कारवाईही झाली. असं असताना प्रशिक्षक म्हणून वादग्रस्त क्रिकेटपटू कसा चालेल असा प्रश्नही त्याला या मुलाखतीत विचारण्यात आला. (David Warner)

‘मी जेव्हा संघात आलो. माझी जडण घडणच तशी झाली. मैदानावर खेळाडूंची लय बिघडवावी, त्यांना डिवचावं म्हणून मी तसं वागायचो. मला तसंच घडवण्यात आलं होतं,’ अशी जवळ जवळ कबुलीच वॉर्नरने (David Warner) दिली. (David Warner)

(हेही वाचा – Gautam Adani Back on Top : मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती)

ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी फलंदाजांपैकी एक वॉर्नर

पण, आता जगभरात सुरू असलेल्या टी-२० लीगमुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे परस्पर संबंध सुधारतील आणि शेरेबाजी कमी होईल, असं त्याला वाटतं. लीगमध्ये विविध देशांचे खेळाडू एकत्र ड्रेसिंग रुममध्ये खेळतील. त्यामुळे हा बदल होईल असं वॉर्नरचं (David Warner) म्हणणं आहे. (David Warner)

‘येत्या ५-६ वर्षांत क्रिकेट बदलेल आणि वागणूक सौम्य होईल. पूर्वी सारखी आक्रमकता क्रिकेटपटूंच्या वागण्यात राहणार नाही,’ असं वॉर्नर (David Warner) म्हणाला. वादग्रस्त असला तरी वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १८,६३२ धावा फटकावल्या आहेत. (David Warner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.