Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता सुपरफास्ट; रेल्वे मंत्र्यांनी केले महत्त्वाचे ट्विट

Mumbai Ahmedabad Bullet Train प्रकल्पासाठी 100 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 'एक्स' या सामाजिक माध्यमावर जमीन अधिग्रहणाची माहिती दिली.

233
Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता सुपरफास्ट; रेल्वे मंत्र्यांनी केले महत्त्वाचे ट्विट
Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता सुपरफास्ट; रेल्वे मंत्र्यांनी केले महत्त्वाचे ट्विट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणारी 1389.49 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. NHSRCLने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, या प्रकल्पाचे सर्व कॉन्ट्रॅक्ट गुजरात आणि महाराष्ट्राला देण्यात आले होते. तसेच, 120.4 किमी गर्डर सुरू करण्यात आले असून, 271 किमी घाटाचे कास्टिंगही पूर्ण झाले, अशी माहिती नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

(हेही वाचा – Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेतील गुणांचा गोंधळ नेमका काय ? महसूल विभागाचे स्पष्टीकरण)

100 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

महाराष्ट्र आणि गुजरातसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने आता गती पकडली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) याविषयी माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 100 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (AshwiniVaishnaw) यांनीही ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर जमीन अधिग्रहणाची माहिती दिली. सोमवार, ८ जानेवारी रोजी याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

6 नद्यांवर पुलाचे काम पूर्ण

या प्रकल्पांतर्गत 24 नद्यांपैकी 6 नद्यांवर, पार (वालसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वालसाड जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय नर्मदा, तापी, माही आणि साबरमती नद्यांवरील काम सुरु आहे, असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा – Jay Jay Swami Samarth : कलर्स मराठी वाहिनीकडून स्वामी समर्थांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न; दर्शकांमध्ये संताप)

16 पूलांचे काम चालू

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वेलाइन (High Speed ​​Rail Line) तयार केली जात आहे. गुजरातच्या (Gujarat) वलसाड जिल्ह्यातील जारोली गावाजवळ फक्त 10 महिन्यांत 350 मीटर लांबी आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा पूर्ण झाला आहे. सूरतमध्ये 70 मीटर लांबी आणि 673 मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील ब्रिज NH 53 वर बांधला गेला असून अशा 28 पैकी 16 पूल बांधकामांचे काम वेगाने सुरु आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.