Swati Mohol : हिंदुत्ववादी असल्यामुळेच शरद मोहोळची हत्या; स्वाती मोहोळ नितेश राणे यांच्यासमोर आक्रमक

Swati Mohol : 'माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली', अशी स्पष्ट भूमिका स्वाती मोहोळ यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या भेटीदरम्यान घेतली. 'माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार आहे', असे त्या म्हणाल्या.

307
Swati Mohol : हिंदुत्ववादी असल्यामुळेच शरद मोहोळची हत्या; स्वाती मोहोळ नितेश राणे यांच्यासमोर आक्रमक
Swati Mohol : हिंदुत्ववादी असल्यामुळेच शरद मोहोळची हत्या; स्वाती मोहोळ नितेश राणे यांच्यासमोर आक्रमक

कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात भर दिवसा हत्या झाली. यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली आहे. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा – WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच)

या भेटीदरम्यान ‘माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली’, अशी स्पष्ट भूमिका स्वाती मोहोळ यांनी घेतली. ‘माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार आहे’, असे त्या म्हणाल्या.

शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी काम करणार

स्वाती मोहोळ (Swati Mohol) या वेळी म्हणाल्या की, सरकार आणि प्रशासनावर माझा पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता; म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असे वाटत असेल की, अशा घटनेमुळे मी खचून जाणार, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार आहे.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे – नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, आज कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन करायला आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत.”

(हेही वाचा – Suryakumar Yadav Injury : सूर्यकुमार यादवला झालेला स्पोर्ट्स हर्निया काय आहे?)

शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले ?

नितेश राणे (Nitesh Rane) पुढे म्हणाले की, “मोहोळ कुटुंबियांचे हिंदु समाजासाठी मोठं काम आहे. शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते, ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले, याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमा केली जात आहे. ती तशी करू नये, अशी विनंती मी करतो.”

स्वाती मोहोळ भाजपच्या पदाधिकारी

शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. या भाजपच्या (BJP) पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांच्यानंतर भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात येणार, अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.