मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांच्या जागी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरु आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपकडून सिने अभिनेत्री माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) यांचे नाव चर्चेत असले तरी प्रत्यक्षात दिक्षित यांनीही आपण निवडणूक लढवण्याच्या बातमीचा इन्कार केला. त्यामुळे या मतदार संघात पुनम महाजन (Poonam Mahajan) यांच्या ऐवजी कोण याबाबत चर्चा रंगायला लागली असून प्रत्यक्षात या मतदार संघातून आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नावालाच विभागात पसंती आहे. त्यामुळे शेलार यांच्या नावाची चर्चा या मतदार संघात संभाव्य उमेदवार म्हणून ऐकायला मिळत आहे. (North Central Lok Sabha Constituency)
मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून पुनम महाजन (Poonam Mahajan) सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला आहे. मात्र, सन २०१४च्या निवडणुकीत एकूण मतांच्या तुलनेत ५६.६१टक्के मते घेणाऱ्या महाजन यांच्या मतांचा टक्का ३ टक्क्यांनी कमी झाला होता. सन २०१९च्या निवडणुकीत महाजन यांना ५३.९७ टक्के मते प्राप्त झाली होती. तर प्रिया दत्त यांना सन २०१४मध्ये ३४.५२ टक्के मते मिळाली होती, तर सन २०१९मध्ये प्रिया दत्त यांना ३९.५५ टक्के मते मिळाली होती. म्हणजे प्रिया दत्त यांच्या मतांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, पुनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यात संघटनेतील संपर्क कमी असल्याने मागील काही महिन्यांपासून संघटनांमध्ये पदाधिकाऱ्यांसोबतच जुळत नाही. त्यामुळे पक्षातच त्यांना आता विरोध होत आहे. त्यामुळे महाजन यांच्या ऐवजी पक्ष संघटनाला महत्व देणाऱ्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. (North Central Lok Sabha Constituency)
(हेही वाचा – Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)
त्यामुळे मागील काही दिवसांपासून या मतदार संघातून महाजन यांच्या ऐवजी माधुरी दिक्षित यांना उमेदवारी देण्याची चर्चा जोरात सुरु असल्याचे ऐकायला मिळत होते. माधुरी दिक्षितचे बॅनर प्रदर्शित झाले होते, त्यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. परंतु माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) यांनी आपण याचा विचार केला नसल्याचे सांगत या चर्चेलाच पुर्णविराम दिल्याचे पहायला मिळाले होते. परंतु या मतदार संघातील मतदारांमधील चर्चेनुसार या मतदार संघात भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नावाला पसंती असल्याचे ऐकायला मिळत आहे. शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. आणि या मतदार संघात शेलार यांच्यासह विलेपार्ले विधानसभा भाजपकडे असून चांदीवली आणि कुर्ला या मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. (North Central Lok Sabha Constituency)
तर वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे झिशान सिध्दीकी आणि कलिना मतदार संघातून शिवसेना उबाठाचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघातील चार मतदार संघ हे युतीला पुरक आहेत. तसेच शेलार यांचे या सर्व विधानसभांमध्ये चांगलीच तोंड ओळख असल्याने ते काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर देऊ शकतात, असे बोलले जात आहे. शेलार (Ashish Shelar) हे भारतीय क्रिकेट असोशिएशनचे खजिनदार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे शेलार यांना दिल्लीत पाठवण्याचा पक्षाचा विचार असून त्यांच्या नावाची चर्चा विभागात सुरु असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात आनंद दिसून येत आहे. या लोकसभा मतदार संघातून सलग दोन वेळा पराभूत झालेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची आता निवडणूक लढवण्याची इच्छा दिसत नसून त्यांच्या ऐवजी माजी आमदार बाबा सिध्दीकी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर दुसरीकडे नसीम खानही इच्छुक आहेत. त्यामुळे बाबा सिध्दीकी आणि शेलार यांना उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणुकीतील कट्टर प्रतिस्पर्धी आता लोकसभेतही पहायला मिळतील अशी शक्यता आहे. (North Central Lok Sabha Constituency)
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार)
सन २०१९ची लोकभा निवडणूक
भाजप, पुनम महाजन, एकूण मते: ४,८६,६७२
काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते :३, ५६,६६७
सन २०१४ची लोकभा निवडणूक
भाजप, पुनम महाजन, एकूण मते: ४,७८,५३५
काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते : २,९१,७६४
सन २००९ची लोकभा निवडणूक
काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते : ३,१९,३५२
भाजप, महेश जेठमलानी, एकूण मते : १,४४, ७९७
मनसे, शिल्पा सरपोतदार, एकूण : १, ३२, ५४६
लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्र आणि निवडून आलेले आमदार
विलेपार्ले : भाजप, पराग अळवणी
चांदीवली : शिवसेना, दिलीप लांडे
कुर्ला : शिवसेना, मंगेश कुडाळकर
कलिना : शिवसेना उबाठा, संजय पोतनीस
वांद्रे पूर्व : काँग्रेस, झिशान सिध्दीकी
वांद्र पश्चिम : भाजप, ऍड आशिष शेलार
हेही पहा –
Join Our WhatsApp Community