Hair Growth: लांबसडक आणि दाट केसांसाठी करा ‘हा’ घरगुती उपाय

आठवड्यातून २ ते ३ वेळा हा बायोटीन हेअर मास्क लावू शकता.

328
Hair Grow: लांबसडक आणि दाट केसांसाठी करा 'हा' घरगुती उपाय
Hair Grow: लांबसडक आणि दाट केसांसाठी करा 'हा' घरगुती उपाय

केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी लाईफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेच असतं. केस गरजेपेक्षा जास्त कोरडे झाले तर केसांच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. केस वाढवण्यासाठी तुम्ही बायोटीन पावडरचा वापर करू शकता. बायोटीन पावडर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. (Easy Ways To Help Your Hair Grow) यामुळे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते आणि केस डॅमेज होण्याचा धोकाही टाळता येते. केस मऊ, मुलायम होतात आणि केसांचा पोत सुधारण्यासही मदत होते. केसांसाठी बायोटीन पावडर घरी कशी बनवता येईल, जाणून घेऊया –

बायोटीन व्हिटामीन बी-७ आहे जे स्किन आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बायोटीन वॉटर सोल्यूबल व्हिटामीन आहे ज्यामुळे कॅरेटिन प्रोडक्शनमध्ये मदत होते. बायोटीनच्या वापराने केस हेल्दी राहण्यास मदत होते आणि केस सुंदर दिसतात. (How to Grow Hairs Faster)

(हेही वाचा – Vijay Wadettiwar : पोलिस महिलेची विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे न्यायाची मागणी)

बायोटीन पावडर…

बायोटीन पावडर बनवण्यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ, ३ चमचे ब्रूअरर्स यीस्ट आणि १ चमचा पाणी घ्या. हळूहळू हे मिश्रण एकजीव झाल्यांतर जाडसर पेस्ट तयारहोईल. हे मिश्रण एका ट्रेमध्ये घाला. आणि १ ते २ दिवस सुकू द्या. २५ ते ४८ तासांनी (२ दिवसांनी) हे मिश्रण कुटून बारीक करा. तयार झाली बायोटीन पावडर. ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा जेणेकरून गरम वातावरण आणि मॉईश्चर टिकून राहील.

केसांसाठी हेअर मास्क…

ही बायोटीन पावडर केसांवर हेअर मास्कच्या स्वरूपात लावू शकता. पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांना मुळांपासून पोषण देतो. जवळपास २० ते ३० मिनिटं हा हेअर मास्क केसांना लावलेला राहू द्या नंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा बायोटीन हेअर मास्क लावू शकता. ही पावडर केसांना लावल्याने केस लांब आणि दाट होतात. यामुळे केसांची वाढही चांगली होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.