खलिस्तान (Khalistani Terrorist) समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurupatwant singh Pannu) याच्या दहशतवादी कुरापती या काही थांबता थांबत नाही. त्याने पुन्हा एकदा प्रक्षोभक व्हिडिओ जारी करून भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेविरोधात पन्नूने विशेष चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.(Terrorist Gurupatwant singh)
अमृतसर ते अयोध्या विमानतळ बंद करण्याची धमकी
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या चिथावणीखोर व्हिडिओमध्ये पन्नूने विशिष्ट समुदायाला भारतातून ‘उर्दिस्तान’ नावाचा वेगळा देश तयार करण्यास सांगितले आहे.अमृतसर ते अयोध्या हा विमानतळ २२ जानेवारीपूर्वी बंद करण्याची धमकीही देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला विरोध करत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. संपूर्ण देशात अयोध्यामध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या तयारी सुरु असताना हा व्हिडिओ समोर आला आहे.
(हेही वाचा : Hair Growth: लांबसडक आणि दाट केसांसाठी करा ‘हा’ घरगुती उपाय)
यापूर्वी शेअर मार्केट उडविण्याची दिली होती धमकी
अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत, नुकतेच उद्घाटन झालेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाला आतापर्यंत ४० हून अधिक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. या भव्य कार्यक्रमादरम्यान चार्टर्ड विमानांच्या लँडिंगसाठी या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. १२ मार्चपासून मुंबई शेअर बाजाराला लक्ष्य करून भारताचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणारा एक व्हिडिओही पन्नूने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community