- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ आता अफगाणिस्तानबरोबर टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठीचा संघ अलीकडे जाहीर झाला. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश आहे. पण, त्यांच्याबरोबर आपला शेवटचा टी-२० सामना २०२० मध्ये खेळलेल्या के एल राहुलचा या संघात समावेश नाही. त्यातच बीसीसीआयने राहुलला वगळलं की विश्रांती दिली हे स्पष्ट केलेलं नाही. (K L Rahul)
त्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विराट आणि रोहित शेवटचा टी-२० सामना खेळले ते २०२०च्या टी-२० विश्वचषकाचा उपान्त्य सामना. या सामन्यात हे तिघे एकत्र खेळले. आणि त्यानंतर तिघेही आंतरराष्ट्रीय टी२० खेळलेले नाहीत. आता अफगाणस्तान विरुद्ध रोहित आणि विराट संघात परतले असले तरी राहुलला संघात स्थान मिळालेलं नाही. (K L Rahul)
याचा अर्थ टी-२० विश्वचषकासाठी राहुल निवड समितीच्या निकषांमध्ये बसत नाही का?
(हेही वाचा – Devendra Fadnvis : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा; पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची २३०० कोटींची मदत)
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेतही राहुल संघात नव्हता. नंतरच्या एकदिवसीय मालिकेत मात्र त्याने संघाचं नेतृत्व केलं. राहुलला संघातून वगळण्यात आल्याचा अर्थ या कृतीतून काढण्यात येत आहे. यावरच माजी सलामीवीर आकाश चोप्राने टीका केली आहे. (K L Rahul)
आपल्या युट्यूब चॅनलवर संघ निवडीबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणतो, ‘के एल राहुलला एकट्यालाच ही वागणूक मिळतेय. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याची कामगिरी उजवी आहे. तर मागच्या टी-२० विश्वचषकातही तो भारताचा तिसरा यशस्वी फलंदाज होता. त्याचा टी-२० मधील स्ट्राईकरेट १३५ धावांच्या आसपास आहे. अशावेळी त्याला वगळणं योग्य नव्हे असं आकाश चोप्राला वाटतं. (K L Rahul)
दुसरीकडे भारतीय निवड समितीने फक्त के एल राहुलच नव्हे तर ईशान किशन या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी केलेल्या यष्टीरक्षक फलंदाजालाही संघातून वगळण्यात आलं आहे. हे निर्णय काही माजी खेळाडूंना रुचलेले नाहीत. (K L Rahul)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community