पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा (Lakshadweep) दौरा करून त्याचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले होते. यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. त्यानंतर बॉयकॉट मालदीव(Boycott Maldives) असा ट्रेंड वायरल होत होता त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या मात्र असे असताना दुसरीकडे मात्र टाटा समूह (tata Group) लक्षद्वीप येथील बेटावर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. यासंदर्भातच इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ने अलीकडेच या बेटांवर ताजब्रँड चे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केला आहे.(Tata Group)
हे रिसॉर्ट २०२६ मध्ये सुरु होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का ना लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या भेटीनंतर लक्ष वेधून घेतलेल्या भारतीय द्वीपसमूहाने. या भेटीमुळे लक्षद्वीपची मालदीवशी तुलना करून सोशल मीडियावर वादविवाद आणि चर्चेसह शाब्दिक युद्ध सुरू झाले. (Tata Group)
(हेही वाचा : India Maldives conflict : भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर मालदीवकडून सारवासारव; म्हणाले …)
असे असेल रिसॉर्ट
ताज सुहेलीमध्ये 60 बीच व्हिला आणि 50 वॉटर व्हिला सह 110 खोल्या असतील, तर ताज कदमतमध्ये 110 खोल्या असतील, ज्यात 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिला असतील. वेलदोड्याची बेटे म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कदमतमध्ये प्रवाळ समृद्ध भूभाग, विस्तृत खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि सागरी कासवांच्या घरट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महत्त्वपूर्ण सागरी संरक्षित क्षेत्र आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community