India Maldives conflict : भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर मालदीवकडून सारवासारव; म्हणाले …

सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, व्यंकटेश प्रसाद आणि वीरेंद्र सेहवाग यांसह आणखी काही खेळाडूंनी मालदीव सरकारला सुनावले. याशिवाय बॉलिवूड कलाकारांनी देखील भारताच्या अपमानाविरोधात आवाज उठवला.

577
India Maldives conflict : भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर मालदीवकडून सारवासारव; म्हणाले ...

रविवार ७ जानेवारी रोजी संध्याकाळी भारत आणि मालदीव (India Maldives conflict) या दोन देशांमध्ये वाद सुरु झाले. मालदीवच्या एका मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख इस्त्रायलचे दूत असा केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मालदीवच्या आणखी दोन मंत्र्यांनीही त्याला जोडून भारताविरुद्ध हिंदूविरोधी टिप्पणी केली.

(हेही वाचा – Boycott Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतविरोधी वक्तव्यांमुळे ‘बॉयकॉट मालदीव’ मोहीम)

काय आहे ‘बॉयकॉट मालदीव’ ट्रेंड ?

त्यानंतर भारतात ‘बॉयकॉट मालदीव’ (Boycott Maldives) हा ट्रेंड जोर धरू लागला. अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर आपण आपली मालदीव सहल रद्द केल्याचे संदेश टाकायलाही सुरुवात केली. राजकीय पातळीवर तर दोन्ही देशांमध्ये (India Maldives conflict) बोलणी सुरू झालीच, शिवाय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मालदीवला जाण्याऐवजी भारतातील लक्षद्वीप सारख्या किनारपट्टीवर फिरायला जा असे सांगितले. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो वायरल केले.

(हेही वाचा – Asus ROG Phone 8 : आसुसचा १ टेराबाईटची मेमरी असलेला फोन पाहिलात का?)

मालदीवचा नरमाईचा सूर –

या सर्व प्रकारामुळे भारतीयांनी मालदीवकडे (India Maldives conflict) पाठ फिरवली. त्यामुळे मालदीव सारख्या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर मालदीव सरकारने आता नरमाईचा सूर लावला आहे. मालदीव असोसिएशन ऑफ ट्युरिस्ट इंडस्ट्रीने एक ट्विट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलेय की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो. भारत हा आपला सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. भारत नेहमीच (India Maldives conflict) संकटाच्या काळात आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. सरकार तसेच भारतातील लोकांमध्‍ये आम्‍ही जे घनिष्ट संबंध प्रस्थापित केलाय, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’

(हेही वाचा – Earthquake Indonesia : इंडोनेशिया मध्ये ६.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का)

खेळाडू आणि कलाकारांचा मालदीववर बहिष्कार –

सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, व्यंकटेश प्रसाद आणि वीरेंद्र सेहवाग यांसह आणखी काही खेळाडूंनी मालदीव सरकारला सुनावले. याशिवाय बॉलिवूड कलाकारांनी देखील भारताच्या अपमानाविरोधात आवाज उठवला. तसेच आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (India Maldives conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.