Varun Tomar Bags Olympic Quota : नेमबाज वरुण तोमरला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट

वरुण तोमर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला चौदावा नेमबाज ठरला आहे.

177
Varun Tomar Bags Olympic Quota : नेमबाज वरुण तोमरला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट
Varun Tomar Bags Olympic Quota : नेमबाज वरुण तोमरला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकसाठी आशियाई स्तरावर झालेल्या पात्रता स्पर्धेत भारताच्या वरुण तोमर (Varun Tomar) आणि ईशा सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. पुरुष आणि महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात दोघांनी सुवर्ण जिंकलं. या दोघांना धरुन पॅरिस पात्रता मिळवलेल्या भारतीय नेमबाजांची संख्या आता १५ झाली आहे. टोकयो ऑलिम्पिकचा आकडा आता भारतीय नेमबाजांनी गाठला आहे. (Varun Tomar Bags Olympic Quota)

दोघांपैकी वरुण तोमरचं (Varun Tomar) यश हे उठून दिसणारं होतं. कारण, तो आता २२ वर्षांचा आहे. आणि या स्पर्धेत त्याच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. (Varun Tomar Bags Olympic Quota)

वरुण तोमरने (Varun Tomar) अंतिम फेरीत २३९.६ गुण मिळवले. तर त्याचाच साथीदार अर्जुन चिमाने २३७.३ गुण मिळवले. अर्जुनला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. (Varun Tomar Bags Olympic Quota)

(हेही वाचा – Devendra Fadnvis : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा; पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची २३०० कोटींची मदत)

तर भारतीय पुरुषांनी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात १७४० गुणांसह सांघिक सुवर्णही जिंकलं. (Varun Tomar Bags Olympic Quota)

पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारानंतर तर भारतीय महिलांनी कमाल केली. ईशा सिंग, सुरभी राव आणि रिदम सांगवान या तीनही भारतीय नेमबाजांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं. १८ वर्षीय ईशाने अंतिम फेरीत आपली कामगिरी उंचावताना अचूक लक्ष्य भेदत २४३.१ गुणांची कमाई केली. रौप्य विजेत्या पाकिस्तानच्या किशमाला तलतपेक्षा ईशाला तब्बल सात गुण जास्त मिळाले. भारताच्या रिदम सांगवानला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. (Varun Tomar Bags Olympic Quota)

१५ भारतीय नेमबाज आतापर्यंत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आणि आशियाई स्तरावरील पात्रता स्पर्धा अजून बाकी असल्यामुळे चांगली कामगिरी झाली तर आणखी तीन खेळाडूंना पात्रता मिळवण्याची संधी आहे. (Varun Tomar Bags Olympic Quota)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.