Zee-Sony Deal Called off? सोनीकडून झीबरोबरचा करार रद्द होण्याची शक्यता

नवीन मीडिया कंपनीचे प्रमुख पुनीत गोयंका राहावेत असं आता सोनीला वाटत नाही. 

226
Sony India Expansion Plans : झी बरोबरचा करार मोडला असला तरी भारतीय बाजारापेठेविषयी सोनीचा उत्साह कायम
Sony India Expansion Plans : झी बरोबरचा करार मोडला असला तरी भारतीय बाजारापेठेविषयी सोनीचा उत्साह कायम
  • ऋजुता लुकतुके

दोन वर्षांपूर्वी मीडिया क्षेत्रातील सगळ्यात मोठा करार मानला गेलेला झी-सोनी विलिनीकरणाचा करार प्रत्यक्षात येणार नाही अशी चिन्हं आहेत. सोनी कंपनी हा करार रद्द करण्याच्या विचारात आहे. मागची २ वर्षं या करारावर बोलणी, तह, वाटाघाटी सुरू आहेत. दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकं मूल्य असलेली देशातील सगळ्यात मोठी मीडिया कंपनी तयार होणार होती. (Zee-Sony Deal Called off)

पण, आधीच्या चर्चेनुसार, या नवीन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झी समुहाचे पुनीत गोयंका (Puneet Goenka) असणार होते. आणि ही अट आता सोनीला मान्य नाहीए. त्यामुळे या करारावरच पुनर्विचार करण्याचं सोनीने ठरवलंय. (Zee-Sony Deal Called off)

(हेही वाचा – Asus ROG Phone 8 : आसुसचा १ टेराबाईटची मेमरी असलेला फोन पाहिलात का?)

या कलमावर झी समुह अडून 

हा करार पूर्ण करण्याची नवीन मुदत २० जानेवारी इतकी आहे. आणि त्यापूर्वीच सोनीकडून करार रद्द करण्याची घोषणा होऊ शकते. २०२१ मध्ये या कराराची बोलणी सुरू झाली तेव्हा एकत्रीकरण झालेल्या कंपनीचे मुख्य अधिकारी झी समुहाचे संस्थापक सुभाषचंद्र गोयंका यांचे पुत्र पुनीत गोयंका (Puneet Goenka) असणार असं ठरलं होतं. पण, त्यानंतर गोयंका कुटुंबं वादात सापडलं. आणि त्यामुळे सोनीला आता या करारात रस उरलेला नाही, असं बोललं जात आहे. (Zee-Sony Deal Called off)

नवीन कंपनी स्थापन झाली तर पुनीत गोयंकाच तिचे प्रमुख असतील या कलमावर झी समुह अडून बसला आहे, असंही समजतं. अर्थात, दोन्ही समुहांकडून या प्रकरणी कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. (Zee-Sony Deal Called off)

(हेही वाचा – India Maldives conflict : भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर मालदीवकडून सारवासारव; म्हणाले …)

यासाठी हा करार या कंपन्यांसाठी महत्त्वाचा होता

सोनी आणि झी समुहातील हा करार भारतातील मीडिया बाजारपेठेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जात होता. कारण, स्वतंत्रपणे दोन्ही कंपन्या आर्थिक दृष्ट्या फारशा चांगल्या स्थिती नव्हत्या. ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी समोर उभं केलेलं आव्हान पेलणं आणि रिलायन्स समुहाची वॉल्ट डिस्नी कंपनीबरोबर सुरू असलेली विलिनीकरणाची बोलणी पार पडल्यावर रिलायन्सला मीडिया क्षेत्रात टक्कर देणं या दृष्टीने हा करार या कंपन्यांसाठी महत्त्वाचा होता. (Zee-Sony Deal Called off)

पण, गेल्यावर्षी झी समुहाचे गोयंका पिता-पुत्र कर्ज परतफेडीच्या घोटाळ्यात अडकले. आणि खुद्द सेबीने झी समुहावर आणि गोयंका यांच्यावर प्रसिद्धीचा गैरवापर करून कंपन्यांवरील कर्ज परस्पर दुसऱ्या कंपन्यांकडे वळवल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर गोयंका कुटुंबीय आर्थिक वादात सापडले. आणि तेव्हापासून झी आणि सोनीच्या या करारात अडथळे निर्माण व्हायला सुरुवात झाली. (Zee-Sony Deal Called off)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.