ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या सेवांवर 18 टक्केऐवजी 28 टक्के दराने GST लागू करण्यात आला आहे. (GST on Online Gaming) यामध्ये गेमिंग कंपन्या आणि सरकारमध्ये वाद चालू झाला आहे. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचे म्हणणे आहे की, गेमिंगवरील नवीन जीएसटी दर 1 ऑक्टोबर 2023 पासून विचारात घ्यावा. याविषयीचे धोरण स्पष्ट करतांना ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर दायित्व अद्याप नाही. उलट ते आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे कंपन्यांना त्यांची जुनी थकबाकी भरावी लागणार आहे.
(हेही वाचा – Tata Group : टाटा समूहाची महत्वाची घोषणा ; लक्षद्वीपमध्ये बांधणार २ रिसॉर्ट)
यामुळे ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 1.5 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. यासाठी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावून २ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. सरकारने जारी केलेल्या कर नोटिसांना न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.
जुलैमध्ये GST कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग (Online Gaming), हॉर्स-रेसिंग (Horse-racing) आणि कॅसिनोवर (Casino) 28 टक्के GST लागू करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी या खेळांवर 18 टक्के कर आकारला जात होता.
(हेही वाचा – India Maldives conflict : भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारानंतर मालदीवकडून सारवासारव; म्हणाले …)
प्रवेश स्तरावरच कर वसूल केला जाणार आहे. समजा तुम्ही गेम खेळण्यासाठी 100 रुपये जमा केले आहेत. या पैशावर 28 टक्के GST लागू होणार आहे. (GST on Online Gaming)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community