Hardik Pandya : हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरला, सरावाला सुरुवात

अफगाणिस्तान विरुद्धची टी-२० मालिका खेळणार नसला, तरी हार्दिक पांड्याने आता जोरदार व्यायामाला आणि सरावाला सुरुवात केली आहे. 

176
IPL 2024 : हार्दिक पांड्याचा आयपीएल हंगामासाठी फलंदाजीचा सराव सुरू
IPL 2024 : हार्दिक पांड्याचा आयपीएल हंगामासाठी फलंदाजीचा सराव सुरू
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धची टी-२० मालिका खेळणार नसला, तरी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आता जोरदार व्यायामाला आणि सरावाला सुरुवात केली आहे. (Hardik Pandya)

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या (IPL) नवीन हंगामापूर्वी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. अजून तो क्रिकेटच्या सरावाला लागलेला नाही. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत तो खेळणार नाहीए. पण, जड वजनं उचलण्याचा व्यायाम त्याने सुरू केला आहे. त्यामुळे आयपीएलच्या तयारीला तो लागलाय हे नक्की. (Hardik Pandya)

एकदिवसीय विश्वचषका दरम्यान बांगलादेश विरुद्धचा सामना खेळताना त्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला साधारण वाटलेली ती दुखापत पुढचे दोन महिने हार्दिकला (Hardik Pandya) त्रास देतेय. आणि तेव्हापासून तो क्रिकेट खेळलेला नाही. पण, आता त्याने निदान व्यायाम सुरू केलाय. खुद्द हार्दिकनेच आपला वेट ट्रेनिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. आणि त्याच्या स्वभावानुसार, ‘आता फक्त एकाच दिशेनं जायचं, पुढे,’ असा संदेश त्यावर लिहिला आहे. (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलमधून (IPL) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल, असं बोललं जातंय. आणि त्याचीच तयारी तो करताना दिसतोय. दोन वर्षं गुजरात टायटन्सकडून खेळल्यानंतर हार्दिक या हंगामात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात (Mumbai Indians team) परतला आहे. यावेळी तो मुंबईचं नेतृत्वही करणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने काळाची गरज ओळखून नवीन नेतृत्वाला संधी देत असल्याचं अलीकडे जाहीर केलं होतं. (Hardik Pandya)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी)

आयपीएल पाठोपाठ टी-२० विश्वचषकही (T20 World Cup) जूनमध्ये होणार आहे. त्यामुळे हार्दिकसमोर या आयसीसी स्पर्धेचं आव्हानही असेल. रोहित शर्मा २०२२ पासून आंतरराष्ट्रीय टी-२० खेळलेला नाही. त्या कालावधीत हार्दिक पांड्‌याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आता भारतीय संघात हार्दिक काय भूमिका निभावतो, रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-२० विश्वचषकात खेळणार का? आणि तो खेळणार असेल तर तोच कर्णधारही असेल का? असे सगळे प्रश्न आता उभे राहिले आहेत. (Hardik Pandya)

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) तसंच निवड समिती यावर नेमका कसा विचार करते आणि आयपीएलमध्ये या खेळाडूंची कामगिरी कशी होते, यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवलंबून आहेत. (Hardik Pandya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.