शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अगदीच जवळ म्हणजे बुधवारी (१० जानेवारी) लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. त्यातच उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी मंगळवारी (९जानेवारी) सकाळी ईडीने धाड टाकली. त्यानंतर पाठोपाठ दुपारी खासदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. (IT Raid)
राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य घरांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या विचारेंच्या जुन्या घरासमोर असलेल्या कार्यालयावर देखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सकाळपासूनच आयकर विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. (IT Raid)
ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का; खासदार राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा
.
. #RajanVichare #incometaxindia #Raid #UddhavThackarey #UBT #Maharashtra #Thane pic.twitter.com/CP3lOoCCse— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 9, 2024
(हेही वाचा : Ravindra Waikar ED : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड; अडचणीत वाढ)
राजन विचारे यांच्याशी संबंधित काही व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आले आहे. काही कार्यालयांवर देखील छापे टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर एकंदरच आमदार अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर इनकम टॅक्स विभागाच्या हाती काही पुरावे लागतात का या अनुषंगाने कुठली कारवाई केली जाईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community