Trinamool Congress : ईडीचे संचालक बंगालमध्ये; तृणमूलची चिंता वाढली

ईडीवर हल्ला करणाऱ्या संशयितांचाही शोध घेतला जात आहे. ईडीकडून सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांनी केवळ जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.

168
Trinamool Congress : ईडीचे संचालक बंगालमध्ये; तृणमूलची चिंता वाढली
Trinamool Congress : ईडीचे संचालक बंगालमध्ये; तृणमूलची चिंता वाढली

ईडीचे संचालक (ED director) राहुल नवीन (Rahul Naveen) सोमवारी रात्री कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. यामुळे तृणमूल काँग्रेसची (Trinamool Congress) चिंता वाढली असून ममता बॅनर्जीच्या (Mamata Banerjee) अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा सध्या राजधानीत रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्याच्या घरावर अधिकारी छापेमारी करण्यासाठी गेले होते. या घटनेनंतर भाजपने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता खुद्द ‘ईडी’च्या (ED) संचालकांनी सोमवारी रात्रीच बंगाल गाठल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Trinamool Congress)

ईडीचे संचालक राहुल नवीन (Rahul Naveen) सोमवारी रात्री कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी (०९ जानेवारी) ते अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यामध्ये हल्ला आणि कारवाईच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ईडीकडून (ED) सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांनी केवळ जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच एफआयआरची (FIR) प्रतही दिली नाही. त्याचप्रमाणे पोलिसांनी कोणतीही सुरक्षा दिली नाही, असा आरोपही ईडीने (ED) केला होता. त्यानंतर राहुल नवीन हे सोमवारी बंगालमध्ये आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Trinamool Congress)

(हेही वाचा – Shiv Sena Dasara Melava आणि ६० लाखांच्या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर)

कथित रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तृणमूलचे (Trinamool Congress) नेते शाहजहाँ शेख यांची चौकशी करण्यासाठी ईडीची (ED) टीम त्यांच्या घरी गेली होती. त्यांच्या घराबाहेर जमलेल्या जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला करीत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले होते. या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. घटनेनंतर शेख फरार झाले असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ईडीवर (ED) हल्ला करणाऱ्या संशयितांचाही शोध घेतला जात आहे. ईडीकडून (ED) सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांनी केवळ जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. (Trinamool Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.