PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाचा अभिषेक २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून रामलल्लाच्या अभिषेकासाठी ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त असणार आहे. जो १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंदांचा असेल.

221
PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन

अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या मंत्र्यांना त्यांच्या वक्तव्यांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना वक्तव्य करणे टाळण्याचे निर्देश दिले आणि भगवान श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची जाणीव ठेवा असे सांगितले. ते स्पष्टपणे म्हणाले की, आस्था ठेवा, पण आक्रमकता नको.

(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार)

कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या – पंतप्रधान मोदी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या मंत्र्यांना सर्व प्रकारचे शिष्टाचार पाळण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, “तुमच्या संबंधित भागात कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या”. २२ जानेवारीनंतर तुमच्या परिसरातील लोकांना रामलल्लाला भेट देण्यासाठी आणा. भगवान श्रीराम जास्तीत जास्त लोकांना आशीर्वाद देवो.

(हेही वाचा – IT Raid : ठाकरे गटाला दुसरा धक्का ,आता वायकरांनंतर विचारेंकडे छापा)

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले?

यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्या विमानतळाचे आणि रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम’ असे करण्यास मान्यता दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ३० डिसेंबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘विमानतळ महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम’ हे नाव रामायण महाकाव्याची रचना करणाऱ्या महर्षि वाल्मिकी यांना आदरांजली वाहते. या नावामुळे विमानतळाच्या अस्मितेला सांस्कृतिक स्पर्शही मिळाला आहे.’ (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Shiv Sena Dasara Melava आणि ६० लाखांच्या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर)

प्राणप्रतिष्ठापना सोहळा –

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाचा अभिषेक २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून रामलल्लाच्या अभिषेकासाठी ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त असणार आहे. जो १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंदांचा असेल. यावेळी पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त (PM Narendra Modi) आणखी चार जण गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.