पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi ) यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर लक्षद्वीप येथील पर्यटनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.क्रिकेट, अभिनय अशा सर्वच क्षेत्रातील लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnvis) त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर म्हणाले की हे मालदीव नव्हे तर कोकण आहे.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, हे मालदीव नाही महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकणातील सिंधुदुर्गचे फोटो आहेत जेव्हा तुम्ही #IndianIslands, भेट द्याल तेव्हा कोकणाला भेट दयायला विसरू नका तसेच येथे आल्यावर वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घ्या असेही त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.
This is not Maldives !
This is our beautiful Konkan which #Maharashtra is blessed with!
Photos are from Sindhudurg..When you #ExploreIndianIslands,
don’t miss out visiting Konkan and get mesmerised by one of the greatest examples of architectural prowess of Chhatrapati… pic.twitter.com/f3oMfErO4r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2024
(हेही वाचा : PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन)
तर तारकर्ली बीचवर भारतातील पहिल्या एकात्मिक स्कूबा डायव्हिंग स्कूल एमटीडीसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्स येथे आहेत(IISDA) (PADI) तारकर्ली बीचवरील भव्य अरबी समुद्राचे चित्तथरारक दृश्य आणि सौंदर्याचा अनुभव घ्या असे त्यांनी म्हणत तेथील समुद्र किनाऱ्यांचे फोटोज शेअर केले आहे.
हेही पहा –