शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाची मुदत संपत आहे. (MLA Disqualification Case) राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर रहाणार’, असे उपमुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
इथेच संशय निर्माण होतो – शरद पवार
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निकालाअगोदर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) भेटीवर बोलतांना म्हणाले, ”ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे. ते जाऊन भेटतात, इथेच संशय निर्माण होतो आहे. राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे.”
एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीच्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही टीका केली आहे.
न्यायाधीश आरोपीला जाऊन भेटले – उद्धव ठाकरे
जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील, तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी ?, असा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरेंनी शिंदे-नार्वेकर भेटीवर टीका केली आहे. ‘लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की न्यायाधीश आरोपीला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत’, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या वेळी म्हणाले. (MLA Disqualification Case)
हेही पहा –