राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मंगळवारी (०९ जानेवारी) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. नेहमी हा सोहळा २७ ऑगस्टला होतो. पण, यंदा या कालावधीच चीनच्या होआंगझाओ इथं आशियाई क्रीडास्पर्धा सुरू होत्या. त्यामुळे हा सोहळा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. २०२३ मधील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी बॅडमिंटनपटू साईसात्त्विक रांकीरेड्डी आणि चिराग पटेल यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोघांनी आशियाई क्रीडास्पर्धेत दुहेरीतील सुवर्ण पदक पटकावलं. तर इंडोनेशिया ओपनमध्येही त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं. (National Sports Awards 2023)
२०२३ मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर त्यांनी झेप घेतली. मंगळवारी पुरस्कार सोहळ्याला मात्र ही जोडी उपस्थिती राहू शकली नाही. दोघं मलेशियात कौलालंपूर इथं स्पर्धा खेळत आहेत. क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) मात्र सोहळ्याला हजर होता. त्याचा पायाचा घोटा दुखावल्यामुळे सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे. तो अर्जुन पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा गरज केला. तर दोन्ही हात नसलेली आणि पायाने तिरंदाजी करणारी शीतल देवीलाही (Sheetal Devi) प्रेक्षकांचा प्रोत्साहनपर पाठिंबा मिळाला. (National Sports Awards 2023)
#WATCH | Delhi: Mohammed Shami received the Arjuna Award from President Droupadi Murmu at the National Sports Awards. pic.twitter.com/znIqdjf0qS
— ANI (@ANI) January 9, 2024
(हेही वाचा – PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन)
भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकात उपविजेता ठरला. या स्पर्धेत शमीने आपल्या गोलंदाजीने २४ बळी मिळवत भारताच्या विजयांत मोलाची कामगिरी बजावली. तो स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर किताब मिळवणारी तिसरी भारतीय महिला वैशाली रमेशबाबूलाही यावेळी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नेमबाज ईशा सिंगने नुकतीच ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. तिचाही अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कुस्तीपटू अंतिम पनघल, मुष्टी योद्धा मोहम्मद हसमुद्दीन हे ही सोहळ्याला हजर होते. (National Sports Awards 2023)
#WATCH | Delhi: Para-archer Sheetal Devi received the Arjuna Award from President Droupadi Murmu at the National Sports Awards. pic.twitter.com/jwkFEd2CjH
— ANI (@ANI) January 9, 2024
महाराष्ट्राच्या ओजस देवतळे आणि अदिती गोपीचंद यांनाही अर्जुन पुरस्कार मिळाला. तर बुद्धिबळातील प्रशिक्षक रमेशबाबू, कुस्तीचे प्रशिक्षक ललित कुमार, हॉकीचे शिवेंद्र सिंग, मल्लखांबाचे प्रशिक्षक गणेश देवरुखकर आणि पॅरा प्रशिक्षक महावीरप्रसाद सैनी यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. (National Sports Awards 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community