Shri Malanggad : मुख्यमंत्री श्रीमलंग गडाची मुक्तता करणारच; डॉ श्रीकांत शिंदेंची ग्वाही

270

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंग गडाची (Shri Malanggad) मुक्तता करणार असल्याचे सांगितले होते, त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे श्रीमलंग गडाची मुक्तता करणारच, अशी ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण तालुक्यातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीमलंग गडाची मुक्तता व्हावी, अशी भावना सर्वांची आहे, तीच भावना माझीही आहे, असे म्हटले होते, मुख्यमंत्री शिंदे हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमलंगडाची (Shri Malanggad) लवकरच मुक्तता करतीलच. असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

(हेही वाचा MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या सांभाव्य निकालावर काय म्हणाले शरद पवार-उद्धव ठाकरे ?)

अफजलखानाचा कोथळा महाराष्ट्रात दोन वेळा काढण्यात आला, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दुसऱ्यांदा प्रतापगडावरील अतिक्रमण काढून या सरकारने त्याचा कोथळा काढला. धर्माचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहोत, तुमच्या माध्यमातून आपला धर्म, आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम सुरू आहे, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.