Chandrashekhar Bawankule : आम्ही राम मंदिराचे राजकारण करीत नाही

राम मंदिरा पेक्षाही मोदींनी केलेली विकासकामे हे आम्हाला मतदानासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्यातूनच आम्हाला मतदान मिळेल आणि आमचा विजय होईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

162
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार; Chandrashekhar Bawankule यांनी व्यक्त केला विश्वास

राम मंदिरा पेक्षाही मोदींनी केलेली विकासकामे हे आम्हाला मतदानासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्यातूनच आम्हाला मतदान मिळेल आणि आमचा विजय होईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)

नाशिकमध्ये काळाराम मंदिरात त्यांनी महाआरती केली आणि त्यानंतर मंदिर परिसरामध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, भाजपाने रामा वरती आणि श्रीराम प्रभूंना मध्ये घेऊन कोणतेही राजकारण केलेले नाही. आम्हाला ते राजकारण करण्याची गरज पण नाही असे स्पष्ट सांगून ते म्हणाले की, मागील दहा वर्षांमध्ये भाजपाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जे सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे त्या कार्याच्या जोरावरच आम्ही पुन्हा लोकसभेमध्ये सत्ता स्थापन करू अशा विश्वास आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – Nitesh Rane : रवींद्र वायकर यांच्यावर नितेश राणेंची कडाडून टीका; म्हणाले…)

नाव न घेता विरोधकांवर टोला 

नागरिकांच्या मनामध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विषयी अतिशय प्रेमाची भावना आहे आणि पुन्हा मोदी यांनी देशाचे नेतृत्व करावं असे मनोमन देशाच्या नागरिकांनी ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला श्री प्रभू रामचंद्रांना मध्ये घेऊन राजकारण करायचे नाही असे सांगून पाहून कोणी म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या नावावरती जे कोणी विरोधी पक्ष राजकारण करत असतील त्यांना यश लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना. नाशिक दौऱ्याची सुरुवात करताना मागील वेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. आता यावेळी मी शहरांमध्ये आहे म्हणून श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन या ठिकाणावरून नाशिक दौऱ्याची सुरुवात करीत आहे असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, श्री प्रभू रामचंद्रांकडे महाराष्ट्र राज्याला यश प्राप्त हो तसेच राज्यातील आणि देशातील गोरगरीब शेतकरी, व्यवसायिक, विद्यार्थी, महिला यांना चांगले आरोग्य लाभो यशोप्राप्ती हो हीच मागणी केली आहे. त्यामुळे मला कोणतेही राजकारण या ठिकाणी करायचे नाही आणि करण्याची देखील इच्छा नाही असे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.