मी विधानसभा अध्यक्ष असलो तरी मी एका मतदारसंघाचा आमदार आहे. त्यातील कामकाज पूर्ण करण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेणे गरजेची होती. 3 जानेवारीला माझी नियोजित बैठक होती. पण माझी तब्येत चांगली नव्हती. म्हणून ९ जानेवारीला माझी भेट झाली. त्यामुळे माझ्या भेटीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही, असा खुलासा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केला.
(हेही वाचा MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या संभाव्य निकालावर काय म्हणाले शरद पवार-उद्धव ठाकरे ?)
माझ्या निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी बिनबुडाचे आरोप
१० जानेवारी रोजी आमदार अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय येणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी अध्यक्ष राहुल नार्वेकर ( (Rahul Narvekar) आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. त्यावरून राहुल नार्वेकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. अखेर त्या टीकेवर राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. आज महत्त्वाच्या कारणाने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. तर याचा अर्थ मी त्यांना भेटू नये, असा होतो का? काही लोक माझ्या निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करतात. पण मी कायद्यानुसारच निर्णय घेईन. जो निर्णय घेणार आहे तो शाश्वत निर्णय घेणार आहे. जनतेला न्याय मिळेल असाच निर्णय घेतला जाईल. कायद्यातील तरतूदीची कुठेही मोडतोड झालेली नाही. माझा निर्णय कायद्याच्या मर्यादेतच राहील. माझा येणारा निर्णय हा कायद्याला धरून असणार आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जो आरोप केला आहे. तो संविधानाचा अपमान केल्यासारखे होईल, असे नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community