BMC : त्वरा करा… मोफत कचरापेटी मिळवा!

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून नगरसेवक नसल्याने अनेक गृहनिर्माण संस्था तथा झोपडपट्ट्यांना कचरा पेट्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता या कचरापेट्या विविध गृहनिर्माण संस्था आणि झोपडपट्ट्यांमध्ये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यापुढे अर्ज करणाऱ्या प्रत्येक वस्त्यांना ओला व सुका कचऱ्याच्या पेट्या दिल्या जाणार आहे.

5437
Medical Group Insurance Scheme : आतापर्यंत केवळ ७९,७६२ कर्मचाऱ्यांचीच वैयक्तिक माहिती
Medical Group Insurance Scheme : आतापर्यंत केवळ ७९,७६२ कर्मचाऱ्यांचीच वैयक्तिक माहिती

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून नगरसेवक नसल्याने अनेक गृहनिर्माण संस्था तथा झोपडपट्ट्यांना कचरापेट्या (Trash cans) उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता या कचरापेट्या (Trash cans) विविध गृहनिर्माण संस्था आणि झोपडपट्ट्यांमध्ये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यापुढे अर्ज करणाऱ्या प्रत्येक वस्त्यांना ओला व सुका कचऱ्याच्या पेट्या दिल्या जाणार आहे. या कचरापेट्या (Trash cans) महापालिकेच्या मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे जर आपल्याला या कचरापेट्या (Trash cans) हव्या असतील तर आपण महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. चला मग, त्वरा करा…आणि मोफत कचरापेटी आपल्या वस्त्यांसाठी मिळवा तर! (BMC)

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्यावतीने नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करून तो वेगवेगळ्या ठिकाणी टाकला जावा यासाठी स्वतंत्र कचरापेट्या (Trash cans) उपलब्ध करून दिल्या जातात. यापूर्वी नगरसेवक निधीतून या पेट्यांची खरेदी करून याचे वाटप नगरसेवकामार्फत नागरिकांना दिल्या जात होत्या. परंतु आता नगरसेवक नसल्याने या कचरापेट्यांची (Trash cans) मागणी विविध गृहनिर्माण संस्था आणि झोपडपट्टी वस्त्यांमधून केल्या जात आहेत. मात्र, यासर्व पार्श्वभूमीवर महापालिका घनकचरा व्यवस्थापनाने सध्या १ लाख २० हजार कचरापेट्यांची (Trash cans) खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या कचरापेट्या (Trash cans) आता महापालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. (BMC)

(हेही वाचा – Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरून टीका; राहुल नार्वेकर यांनी केला प्रतिवाद; म्हणाले….)

१२० लिटरच्या दोन कचरापेट्या नागरिकांना दिल्या जाणार 

महापालिकेने ओल्या व सुका कचरापेट्या (Trash cans) खरेदी केल्यांनतर या कचरापेट्या (Trash cans) गृहनिर्माण संस्थांच्या तसेच झोपडपट्ट्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी ज्या सोसायटी आणि झोपडपट्ट्यांना कचरापेट्यांची (Trash cans) आवश्यकता आहे, त्यांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त यांच्याकडे किंवा ७०३०० ७९७७७ या भ्रमणध्वनी क्रमांकावरील व्हॉट्सअप क्रमांकावर अर्ज पाठवावे असे आवाहन लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केले आहे. या अर्जांच्या मागणीनुसार १२० लिटरच्या दोन कचरापेट्या (Trash cans) या ओला व सुका कचऱ्याकरता नागरिकांना दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, माजी नगरसेवक हरिष भांद्रीग्रे आणि स्वप्ना म्हात्रे आदी उपस्थित होते. (BMC)

लोकांच्या अर्जांनंतर संबंधितांना यापूर्वी कचरापेटी (Trash cans) दिली आहे का याची छाननी तथा माहिती घेऊन या कचरापेट्यांची (Trash cans) जोडी दिली जाणार आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी ज्यांना कचरापेट्या (Trash cans) दिल्या आहेत, त्यांना प्राधान्याने कचरापेट्या (Trash cans) उपलब्ध होतील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या १ लाख २० हजार कचरापेट्यांच्या (Trash cans) खरेदीमुळे ६५ हजार सोसायटी तथा वस्त्यांना वाटप केले जाईल, परंतु लोकांची मागणी वाढल्यास अधिक कचरापेट्या (Trash cans) खरेदी केल्या जातील असेही पालकमंत्र्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.