Akhilesh Yadav on RamMandir : अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण

Akhilesh Yadav on RamMandir : अखिलेश यादव यांनी आलोक कुमार यांचीच हेटाळणी केली आहे. ते म्हणाले, ''यांना मी त्यांना ओळखत नाही. ज्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांना निमंत्रण देत नाही आणि त्यांच्याकडून निमंत्रण स्वीकारतही नाही.''

269
Akhilesh Yadav on RamMandir : अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण
Akhilesh Yadav on RamMandir : अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण

अयोध्येतील (Ayodhya) राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण चालू आहे. आतापर्यंत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav on RamMandir) हे स्वत:ला निमंत्रण मिळत नसल्याचे सांगत होते. आता मात्र विश्व हिंदू परिषदेकडून (Vishwa Hindu Parishad) समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) प्रमुखांना राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना (Rammandir Pran Pratishtha) सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

(हेही वाचा – BMC : त्वरा करा… मोफत कचरापेटी मिळवा!)

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण घेऊन निमंत्रक आले असतांना अखिलेश यादव यांनी हे निमंत्रण स्वीकारलेले नाही. विश्व हिंदू परिषदेकडून (Vishwa Hindu Parishad) आलोक कुमार हे अखिलेश यादव यांच्याकडे निमंत्रण घेऊन गेले होते. या वेळी अखिलेश यादव यांनी आलोक कुमार (Alok Kumar) यांचीच हेटाळणी केली आहे. ते म्हणाले, ”यांना मी त्यांना ओळखत नाही. ज्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांना निमंत्रण देत नाही आणि त्यांच्याकडून निमंत्रण स्वीकारतही नाही.”

याविषयी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी सांगितलं की, सुरुवातीला ते म्हणत होते, ‘जर बोलावलं तर आम्ही जावू.’ आता आम्ही निमंत्रण दिले आहे, तर श्रीरामांनी बोलावल, तर जाऊ म्हणत आहेत. आता श्रीराम त्यांना स्वत: बोलावतात का, हे पाहावे लागेल. जर त्यांना बोलावले नाही, तर त्यांना बोलावण्याची श्रीरामांची इच्छा नव्हती, असे म्हणावे लागेल.”

(हेही वाचा – Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरून टीका; राहुल नार्वेकर यांनी केला प्रतिवाद; म्हणाले….)

राममंदिरविरोधी परंपरा 

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे वडिल मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. अयोध्येत 1990 मध्ये श्रीराम जन्मभूमीपाशी कारसेवा झाली. मात्र त्या वेळच्या केंद्रातल्या विश्वनाथ प्रताप सिंह सरकारचा आणि उत्तर प्रदेशातल्या मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) सरकारचा या कारसेवेला तीव्र विरोध होता. हा विरोध मोडून काढत लाखो कारसेवक अयोध्येत जमले होते. या कारसेवकांना विरोध करून बाबरी मशिदीचे जतन करण्याचा मुलायम सिंह यादवांचा हट्ट होता. (Akhilesh Yadav on RamMandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.