DGP Rashmi Shukla : राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. मी सकारात्मक दृष्टीने चार्ज घेत आहे, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल असे शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

371
DGP Rashmi Shukla : राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला
DGP Rashmi Shukla : राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मंगळवारी (०९ जानेवारी) सायंकाळी पदभार स्वीकारला. मी सकारात्मक दृष्टीने चार्ज घेत आहे, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल असे शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी ४ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली होती. (DGP Rashmi Shukla)

पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडून शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मंगळवार (०९ जानेवारी) रोजी सायंकाळी पदभार स्वीकारला. दरम्यान शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारासोबत सवांद साधला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल तसेच सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था कायम चांगली असते ती पुढे अशीच ठेवू असे शुक्ला यांनी विश्वास व्यक्त केला. (DGP Rashmi Shukla)

(हेही वाचा – Snowfall In Kashmir : काश्मीरमधील पर्यटक बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत)

अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील – रश्मी शुक्ला 

राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातावर शुक्ला (Rashmi Shukla) यांनी चिंता व्यक्त करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील असे शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पत्रकार परिषदमध्ये म्हटले आहे. मी सकारात्मक दृष्टीने चार्ज घेत आहे, माझ्या कार्यकाळात कुणावरच अन्याय होणार नाही अशी ग्वाही शुक्ला (Rashmi Shukla) यांनी दिली. माझ्यासाठी महाराष्ट्र नवीन नाही, मी याठिकाणी ३३ वर्ष काम केले आहे, महाराष्ट्र हे माझं घर आहे. निवडणूक काळात राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल याची दक्षता घेतली जाईल, मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यावेळी म्हणाल्या. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. शुक्ला (Rashmi Shukla) या ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहे. (DGP Rashmi Shukla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.