रोहिंग्या-बांगलादेशी मुस्लिमांना भारतात घुसवणाऱ्या अबू सालेहला युपी ATSने केले गजाआड

251
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रोहिंग्यांना देशात बेकायदेशीरपणे घुसवणाऱ्या टोळक्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. आरोपी अबू सालेह हा लखनऊचा असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. तो एनजीओ चालवतो, त्यामाध्यमातून देश-विदेशातून या कामासाठी निधी जमवतो.

6 जणांना अटक करण्यात आली

यूपी  ATS ने अबू सालेह एक लाख रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. अबूने उत्तर प्रदेशातील देवबंद येथील मदरशातून शिक्षण घेतले आहे. त्याने टोळी तयार करून म्यानमारमधून येणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी बेकायदेशीर व बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून त्यांना भारतातील विविध शहरात स्थायिक केले. यूपी ATS ला बऱ्याच दिवसांपासून याची माहिती मिळत होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे यूपी एटीएसने कारवाई करण्यासाठी एक टीम तयार केली. यानंतर या टोळक्याशी संबंधित 6 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अदिलुर रहमान असराफी, अबू हुरैरा गाझी, शेख नजीबुल हक, तानिया मंडल, इब्राहिम खान आणि मोहम्मद अब्दुल अवल यांचा समावेश आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर अबूच्या कारनाम्याची माहिती मिळाली.

खात्यांमध्ये सुमारे 58 कोटी रुपये आले

अबू सालेहने  ATS ला सांगितले की, तो हरोआ-अल जमियातुल इस्लामिया दारुल उलूम मदरसा आणि कबीरबाग मिल्लत अकादमी असे दोन ट्रस्ट चालवतो. 2018-22 या वर्षात ब्रिटनच्या उम्मा वेलफेअर ट्रस्टकडून या ट्रस्टच्या FCRA खात्यांमध्ये सुमारे 58 कोटी रुपये आले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि मदत केल्याबद्दल अमेरिकेने उम्मा ट्रस्टवर बंदी घातली आहे. परदेशातून मिळालेल्या या निधीचा मोठा हिस्सा तो त्याच्या टीम सदस्यांमार्फत बनावट बिलिंग करून मिळवायचा. एवढेच नाही तर अबू सालेहने अब्दुल्ला गाझी नावाच्या आरोपीसोबत मिळून गाझी फूड्स सप्लाय आणि गाझी मेसनरीज नावाची बनावट फर्म स्थापन केली आणि त्याद्वारे मिळालेल्या देणग्यांची बिले काढले. ही संस्था केवळ कागदावरच आहे.

बनावट भारतीय कागदपत्रे बनवून द्यायचा

ATS च्या चौकशीत त्याला हवालाद्वारे काही रोकड मिळाल्याचेही समोर आले. हा पैसा त्याने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांना भारतात घुसवून त्यांना स्थायिक करण्यासाठी वापरला. एवढेच नाही तर तो या लोकांना आर्थिक मदत करून बनावट भारतीय कागदपत्रे बनवून द्यायचा. काही रक्कम त्याने इतर देशविरोधी कारवायांसाठीही वापरली. यूपी ATS ने पुरावे गोळा केल्यावर अबू सालेहला लखनऊच्या मानक नगर येथून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. एटीएसचे एडीजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, अबू सालेहविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी गरज पडल्यास त्याला पोलीस कोठडीतही घेण्यात येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.