शिवसेना अपात्रतेच्या उद्याच्या निर्णयाला पाहता उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे विशेष पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीचे मुख्य कारण जरी गुलदस्त्यात असले तरी उद्या येणाऱ्या शिवसेना अपात्रतेच्या निर्णयानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये यासाठी ही बैठक आयोजित केले असल्याचे बोलले जात आहे. १२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते मुंबईमध्ये विविध कामांचे उद्घाटन करणार असल्याने व मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा कसे समोर जावे या संदर्भातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बैठक असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा शिवसेना अपात्रतेच्या निर्णयामुळे मुंबई सहित महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याचे देखील सांगितले जात आहे.