गेल्या सहा महिन्यांपासून आमदार अपात्रता प्रकरण हे चांगलेच गाजत आहे. त्यावर आता बुधवार १० जानेवारी रोजी निकाल (MLA Disqualification Case) जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे.निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र असं जरी असले तरी राहुल नार्वेकर आज खरंच निकाल जाहीर करतील का? किंवा न्यायालयाकडे अजून वेळ मागतील अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (MLA Disqualification Case )
एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारून भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. हा निकाल सहा भागात असणार असून एकूण ३४ याचिकांवर हा निकाल असणार आहे. दरम्यान निकालापूर्वी सकाळी दहा वाजता मंत्रीमंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. तसेच निकालाच्या आदल्यादिवशी सायंकाळी हालचालींना वेग आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षा बंगल्या वर आल्या होत्या. (MLA Disqualification Case )
निकालासाठी अजून वेळ मागणार ?
विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याने न्यायालय अध्यक्षांना आदेश देऊ शकत नाही त्यामुळे १० जानेवारीला निकाल देण्याचे बंधन अध्यक्षांना नाही. त्यामुळे अध्यक्ष हा निकाल पुढे ढकलू शकतात. यापूर्वीही त्यांना ३१ डिसेंबर ची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर १० जानेवारी पर्यंतची मुदत मागितली. तर नार्वेकर हे काही कामा निमित्त गोव्याला होते ते बुधवारी सकाळीच मुंबईत आले असल्याचे कळते. मात्र आमदार अपात्रता प्रकरणी काय नियोजन असेल हे ही याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आज निकाल लागेल का नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
(हेही वाचा : MLA Disqualification Case : ‘हे’ आमदार ठरणार का अपात्र ?)
जर निर्णय दिला तर काय निर्णय देतील
शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकारणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयात आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. त्यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले.सगळ्यांची साक्ष ऐकून घेतली. त्यानंतर निकाल लागणार आहे.
हेही पहा –