सोमवारी संध्याकाळी उशिरा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा इंडी आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले. “ही निव्वळ धूळफेक आहे,” अशा तिखट शब्दात वंचित बहुजन आघाडीने प्रतिक्रिया दिली. (India Alliance)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : ‘हे’ आमदार ठरणार का अपात्र ?)
काहीही तथ्य नाही
“दिल्लीत सोमवारी इंडी आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती. आमच्या सूत्रांकडून आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल चर्चा झाल्याचे समजले. पण निश्चित काय निर्णय झाला ते समजले नाही. जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत, तोपर्यंत ह्या बातमीत काहीही तथ्य नाही. वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू,” असे वंचित बहुजन आघाडी प्रदेशाअध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले. (India Alliance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community