Ravindra Waikar : तब्बल १५ तास चालली वायकरांची चौकशी; १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना

वायकर यांच्या कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. तर वायकरांशी संबंधित ४ ठिकाणी ईडीची छापेमारी झाली आहे. तर पुढील चौकशीसाठी १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्या आहेत.

201
Ravindra Waikar : तब्बल १५ तास चालली वायकरांची चौकशी; १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी मंगळवारी सकाळी सात वाजता ईडीने छापेमारी केली. तब्बल १५ तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली. वायकर यांच्या कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. तर वायकरांशी संबंधित ४ ठिकाणी ईडीची छापेमारी झाली आहे. तर पुढील चौकशीसाठी १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्या आहेत. (Ravindra Waikar )

काय होते आरोप
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबर महिन्यात वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.

(हेही वाचा : India Alliance : वंचित चा इंडी आघाडीत समावेश ‘ही निव्वळ धूळफेक’: वंचित बहुजन आघाडी)

नेमकं प्रकरण काय ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र,  ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.त्यामुळे आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या रवींद्र वायकर (Ravindra Waikar ED) यांच्यावर अटकेची कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.