Shortest Ever Test Match : केपटाऊनमधील खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे

केपटाऊन मधील न्यूलँड्सची खेळपट्टी असमाधानकारक असल्याचा शेरा आयसीसीने मारला आहे.

193
Shortest Ever Test Match : केपटाऊनमधील खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे
Shortest Ever Test Match : केपटाऊनमधील खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची केपटाऊन कसोटी पाच सत्रांमध्ये संपली होती. क्रिकेटच्या इतिहासातील ही सगळ्यात कमी काळ चाललेली कसोटी ठरली. त्यानंतर अर्थातच खेळपट्टीवरून जगभर प्रतिक्रिया उमटल्या. आता आयसीसीनेही या खेळपट्टीवर ‘असामाधनकारक’ असल्याचा शेरा मारला आहे. भारताने मात्र ही कसोटी ७ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. (Shortest Ever Test Match)

प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर आयसीसीकडून खेळपट्टीबद्दल अहवाल सादर करण्यात येतो. मुख्य खेळपट्टी आणि आऊटफिल्ड अशा दोन्हीचं परीक्षण आयसीसीकडून होतं. (Shortest Ever Test Match)

‘न्यूलँड्समधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत आव्हानात्मक होती. संपूर्ण कसोटीत इथं चेंडू अनियमित आणि झपकन उसळी घेत होता. चेंडू अनेकदा फलंदाजांच्या ग्लव्हजना लागून उडाले. आणि अनेकदा फलंदाज अचानक उसळी घेतलेल्या चेंडूंवर बाद झाले. अनेक चेंडू हे खेळण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे फलंदाज आपले फटके खेळूच शकले नाहीत,’ असं आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. (Shortest Ever Test Match)

(हेही वाचा – Ind W vs Aus W T20 Series : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांचा ७ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियन महिलांनी मालिकाही जिंकली)

सामनाधिकाऱ्यांनी एखाद्या खेळपट्टीवर असा शेरा मारला की, खेळपट्टीचा एक गुण कमी होतो. (Shortest Ever Test Match)

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडे या शेऱ्याबद्दल अपील करण्यासाठी १४ दिवस आहेत. तर आयसीसीला या अहवालाचा फेरविचार करावा लागेल. (Shortest Ever Test Match)

आयसीसीकडून खेळपट्टीचे असे सहा गुण कमी झाले तर त्या मैदानावर एका वर्षासाठी बंदी लादली जाते. आणि तिथे आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकत नाहीत. १२ गुण कमी झाले तर २ वर्षांची बंदी येते. प्रत्येक खेळपट्टीचं मूल्यमापन ५ वर्षांसाठी केलं जातं. (Shortest Ever Test Match)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.