सारथी, बार्टी महाज्योती या संस्थाची पीएचडी फेलोशीप मिळविण्यासाठी बुधवारी ( १० जानेवारी) परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत पुण्यातील वडगाव येथील केंद्रावर पेपर सील पॅक न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले व परीक्षा केंद्राबाहेर घोषणा दिल्या. अशीच घटना छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील कमला नेहरू कॉलेजच्या केंद्रावरही पेपर फुटल्याची घटना घडली.(Phd Fellowship)
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पीएचडी फेलोशीप पात्रता परीक्षा २४ डिसेंबर २०२३ ला घेण्यात आली होती.(Phd Fellowship)
प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागावर या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र ही प्रश्नपत्रिका सेट २०१९ च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशीच्या तशी असल्याचे आढळले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी परीक्षा घेण्यात आली मात्र याही परीक्षेची प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्याने विदयार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर बहिष्कार घालत बाहेर येऊन घोषणा दिल्या. तर प्रश्नपत्रिका सील नसल्याने प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.
(हेही वाचा : Shortest Ever Test Match : केपटाऊनमधील खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे)
परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी
पुण्यातील काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनअरिंग या सेंटर वर बार्टीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित जमत परीक्षा केंद्रात न जाता प्रवेशद्वारावर आंदोलन केले.पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विदयार्थ्यांनी या पात्रता परीक्षेवर बहिष्कार टाकला . पात्रता परीक्षेत सातत्याने होत असलेल्या अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ही परीक्षा रद्द करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community