अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) सोन्याचा मुलामा असलेल्या दाराचा फोटो मंगळवारी (९ जानेवारी) व्हायरल झाला. मंदिरात सोन्याचा मुलामा असलेले आणखी १३ दरवाजे लागणार आहेत. आगामी ३ दिवसात हे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मंदरात सोन्याचा मुलामा असेली १४ आणि चांदीचे कोटिंग असलेली ३० द्वारे लावली जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी स्मारक ट्रस्टच्या सदस्यांनी दिली.
(हेही वाचा – Phd Fellowship : सारथी, बार्टी आणि महाज्योती चा पीएचडी फेलोशीपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार)
गर्भगृहाच्या दोन्ही बाजुला लागणाऱ्या दरवाजांवर काम सुरु –
अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली जाणार आहे. दरम्यान गर्भगृहाच्या मुख्य दरवाजांची पूजा करण्यात आली आहे. त्याचबरोबर गर्भगृहाच्या दोन्ही बाजुला लागणाऱ्या दरवाजांवर काम केले जात आहे. या दरवाजांवर हत्ती, कमळ तसेच अन्य कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात सोन्याचे आणखी १३ दरवाजे लावले जाणार आहेत.
(हेही वाचा – MLA Disqualification Case : कायद्याला धरूनच निर्णय घेतला जाईल – राहुल नार्वेकर)
कसे असतील मंदिराचे दरवाजे ?
हैदराबादची १०० वर्षे जुनी कंपनी अनुराधा टिंबर राम मंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) लाकडाचे दरवाजे तयार करत आहेत. मात्र हे दरवाजे अयोध्येतील वर्कशॉपमध्ये तयार केले जात आहेत. दरवाजांवर नागर शैली प्रतिबिंबित करण्यात आली आहे. मंदिराच्या दरवाजांना सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. या नक्षीदार दरवाजांवर विष्णु कमळ, वैभवाचे गज हत्ती आदि चित्रे कोरण्यात आली आहेत. हे दरवाजे सागवानच्या लाकडापासून बनवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात एकूण ४४ दरवाजे लावले जातील. त्यातील १४ दरवाजांवर सोन्याचा तर ३० दरवाजांवर चांदीचा मुलामा दिला जाईल. त्याचबरोबर रामलल्लाचे (Ayodhya Ram Mandir) सिंहासनही चांदीचे बनवण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community