Campa to Sponsor Cricket in India : भारतातील सामन्यांचं प्रायोजकत्व कॅम्पाकोलाकडे

कॅम्पा कंपनीची मालकी रिलायन्सकडे गेल्यानंतर हा ब्रँड पुनर्स्थापित करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

232
Campa to Sponsor Cricket in India : भारतातील सामन्यांचं प्रायोजकत्व कॅम्पाकोलाकडे
Campa to Sponsor Cricket in India : भारतातील सामन्यांचं प्रायोजकत्व कॅम्पाकोलाकडे
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स कंपनीचा शीतपेयांचा ब्रँड कॅम्पा कोला बीसीसीआयबरोबर प्रायोजकत्वाचा मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. भारतात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय मालिकाचं प्रायोजकत्व आता कॅम्पाकडे असेल. हा करार नेमका किती रुपयांचा आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, यापूर्वी पेप्सी आणि कोकाकोला या कंपन्यांची मक्तेदारी या निमित्ताने रिलायन्सने मोडलेली दिसत आहे. (Campa to Sponsor Cricket in India)

एका वर्षापूर्वी रिलायन्सने कॅम्पा हा जुनाच ब्रँड विकत घेतला. आणि त्यानंतर बाजारपेठेत या ब्रँडचं नाव होईल अशी ही पहिली संधी चालून आली आहे. भारतात होणाऱ्या मालिकांमध्ये मैदानात फक्त कॅम्पाचीच उत्पादनं विकता येतील, खेळाडूंनाही कॅम्पाची उत्पादनं दिली जातील. आणि जर्सीवरही त्याचं नावं असेल अशा प्रकारचा हा करार असेल. (Campa to Sponsor Cricket in India)

(हेही वाचा – Shooting Asian Qualifiers : रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण)

कॅम्पा क्रिकेट हे शीतपेय केलं लाँच 

भारतात होणारं महिला क्रिकेट तसंच १९ वर्षांखालील क्रिकेट यासाठीही हा करार झाला आहे. रिलायन्स कंपनीने कॅम्पा ब्रँड विकत घेतल्यानंतर गेल्याच वर्षी कॅम्पा क्रिकेट हे शीतपेय लाँच केलं होतं. क्रिकेट हीच संकल्पना असलेलं हे लेमन फ्लेवरचं पेय नवीन हंगामात रिलायन्सकडून जास्तीत जास्त पुढे केलं जाईल. (Campa to Sponsor Cricket in India)

२०२२ मध्ये रिलायन्सने भारतातील बंद पडलेला कॅम्पा ब्रँड २२ कोटी रुपयांना विकत घेतला होता. आणि सध्या आपली उत्पादनं ते रिलायन्स जिओ मार्टमध्ये विकत आहेत. पण, हळू हळू भारतभर या उत्पादनांचा विस्तार त्यांना करायचा आहे. क्रिकेट प्रायोजकत्व हा त्यातलाच एक भाग असेल. (Campa to Sponsor Cricket in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.