- ऋजुता लुकतुके
ॲमेझॉनने (Amazon) एका महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेत अलीकडे ट्विच हे लाईव्ह स्ट्रिमिंग ॲप विकत घेतलं होतं. पण, कंपनीला अपेक्षित कामगिरी हे ॲप करू शकलं नाही. त्यामुळे ट्विचमधून ५०० जणांची नोकर कपात करण्याचा ॲमेझॉनने निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्ग कंपनीने (Bloomberg Company) ही बातमी दिली आहे. मागच्या काही महिन्यात कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी ही कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अशाप्रकारचा निर्णय अपेक्षित होताच. (Amazon Lay-off)
Twitch is cutting 500 jobs, 35% of staff. Damn. https://t.co/kg6HAD2534
— Jez (@JezCorden) January 9, 2024
२०२३ च्या वर्षभरात ट्विट ॲपमधून मुख्य प्रोडक्ट अधिकारी, महसूल अधिकारी, मुख्य कस्टमर अधिकारी आणि मुख्य कन्टेन्ट अधिकारी अशा चार महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांनी राजीनामे दिले. ट्विचवर एका महिन्यात १.८ अब्ज तासांचा लाईव्ह व्हिडिओ कन्टेन्ट दाखवला जातो. आणि तो तसा अव्याहत दाखवणं ही खर्चाच्या दृष्टीने कठीण गोष्ट आहे, असं ट्विचच्या अधिकाऱ्यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं. (Amazon Lay-off)
(हेही वाचा – Manoj Saunik मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार)
ॲमेझॉनने (Amazon) ट्विच विकत घेतल्याला ९ वर्षं झाली. पण, अजूनही हे ॲप आणि वेबसाईट नफ्यात आलेलं नाही. त्यामुळेच ही नोकर कपात होणार असल्याचं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. गेल्यावर्षी ॲमेझॉन कंपनीनेही (Amazon company) दोन हप्त्यांमध्ये जगभरात नोकर कपात केली. आणि यात ट्विचचा वाटा ४०० लोकांचा होता. आताही ट्विचमधून आणखी ५०० कर्मचारी जगभरात आपली नोकरी गमावतील, अशी शक्यता आहे. (Amazon Lay-off)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community