नुकत्याच पार पडलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-३ केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या दोन नाटकांनी प्रथम आणि तृतीय पारितोषिक पटकावले आहे. त्यात सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) यांच्या ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ या नाटकाला प्रथम आणि उपप्रमुख कामगार अधिकारी (पूर्व उपनगरे) यांच्या ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. याशिवाय स्वराज्य फाउंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘फियर फॅक्टर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा संचालक (सांस्कृतिक कार्य) विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिकेसाठी कौतुकाची बाब म्हणजे ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ आणि ‘फियर फॅक्टर’ या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी व संपर्क अधिकारी अमित वैती यांना उत्कृष्ट अभिनयासाठी (‘जेंडर अॅन आयडेंटीटी’) रौप्यपदक जाहीर झाले आहे. (BMC)
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी पारितोषिक प्राप्त नाटक आणि कलाकारांचे अभिनंदन केले आहे. (BMC)
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिनांक १६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-३ केंद्रावरील निकाल नुकतेच जाहीर झाले. या स्पर्धेत एकूण १८ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून डॉ. राजीव मोहोळ, बाळ बरगाळे आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले. (BMC)
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी व संपर्क अधिकारी अमित वैती यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे. तसेच बकुळ धवणे यांना ‘द फियर फॅक्टर’ या नाटकातील भूमिकेसाठी रौप्यपदक जाहीर झाले आहे. (BMC)
दिग्दर्शानासाठी राजेंद्र पोतदार (प्रथम, नाटक- जेंडर अॅन आयडेंटीटी), समीर पेणकर (द्वितीय, नाटक- द फियर फॅक्टर) यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रकाश योजनेसाठी श्याम चव्हाण (प्रथम, नाटक- एलिजीबीलीटी), संजय तोडणकर (द्वितीय, नाटक- अरण्यदाह) यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. (BMC)
(हेही वाचा – Campa to Sponsor Cricket in India : भारतातील सामन्यांचं प्रायोजकत्व कॅम्पाकोलाकडे)
नेपथ्यामध्ये पंकज वेलिग (प्रथम, नाटक- जेंडर अॅन आयडेंटीटी), रजनिश कोंडविलकर (द्वितीय, नाटक- पुढच्या वर्षी लवकर या) यांनी पारितोषिक पटकाविले आहे. रंगभूषेसाठी राजेश परब (प्रथम, नाटक- एलिजीबीलीटी), आनंद एकावडे (द्वितीय, नाटक- सखी उर्मिला) यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. (BMC)
याशिवाय अभिनयासाठी सविता चव्हाण (नाटक- साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपूर्ण), इशा कालेकर (नाटक- चाफा बोलेना), सोनाली जानकर (नाटक- रुद्राक्षा), भारती पाटील (नाटक- पुढच्या वर्षी लवकर या), मृदूला अय्यर (नाटक- पुढच्या वर्षी लवकर या), अमित सोलंकी (नाटक- एलिजीबीलीटी), सुचित ठाकूर (नाटक- अरण्यदाह), सचिन पवार (नाटक- जेंडर अॅन आयडेंटीटी), महेंद्र दिवेकर (नाटक- साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपूर्ण), गौरव सातपुते (नाटक- द फियर फॅक्टर) यांनाही पारितोषिक जाहीर झाले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community