MLA Disqualification Case : संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावर मुनगंटीवारांनी दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेनेत केलेलं बंड हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईला पात्र ठरते का, यावर पुढील काही तासात निर्णय होणे अपेक्षित आहे व ही जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आहे. या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

201
MLA Disqualification Case : संजय राऊत यांच्या 'त्या' विधानावर मुनगंटीवारांनी दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारून भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. त्यावर बुधवार १० जानेवारी रोजी निकाल (MLA Disqualification Case) जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : कायद्याला धरूनच निर्णय घेतला जाईल – राहुल नार्वेकर)

अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजचा हा निकाल (MLA Disqualification Case) आधीच ठरलेला असून ही मॅच फिक्स असल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेला (Sudhir Mungantiwar) भाजप आमदार सुनील मुनगंटीवार यांनी चोख उत्तर दिलं आहे. ‘सूर्य हा नेहमी पूर्वेकडूनच उगवतो, यात आत्मविश्वासाचा काय संबंध?’ असा प्रश्न विचारात मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : आमदार पात्र-अपात्रतेच्या निकालात ‘परिशिष्ट दहा’ ठरणार महत्वाचे; काय आहेत यात तरतुदी?)

नेमकं काय म्हणाले सुनील मुनगंटीवार ?

“काही लोकांना लांडगा आला रे आलासारखी सवय असते. त्या कथेचा अंत काय होतो हे आपल्याला माहिती आहे. कुणीही महाराष्ट्रातल्या जनादेशाचा अवमान करू नये” असे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की; “काही जणांकडून न्यायप्रक्रियेची (MLA Disqualification Case) चूक असल्याचं सांगणं सुरू झालं आहे. भारताची नसून जर्मनीच्या गोबेल्सची अशी नीती आहे. अनेकदा खोटं बोला, म्हणजे लोकांना हे खरं वाटतं. सरकारला घटनाबाह्य म्हटलं नाही, तर शिवसैनिकांच्या मनातून संजय राऊत कायमचे उतरतील आणि म्हणूनच ते असे विधान करून कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

(हेही वाचा – Amazon Lay-off : ॲमेझॉन कंपनी ५०० जणांना नोकरीवरून काढण्याच्या तयारीत)

सत्याचा विजय होतो, यात आत्मविश्वासाचा प्रश्न येतोच कुठे ?

सत्ताधाऱ्यांना निकाल (MLA Disqualification Case) शिंदे गटाच्याच बाजूने लागेल एवढा आत्मविश्वास कुठून आला? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना मुनगंटीवार म्हणाले आहेत की; “सूर्य हा पूर्वेकडूनच उगवतो. त्यात आत्मविश्वासाचा काही संबंध आहे का? हा तर सृष्टीचा नियम आहे. नेहमी सत्याचाच विजय होतो, यात आत्मविश्वासाचा प्रश्न येतोच कुठे ? उद्या एक हजार वकील सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणाले आणि फक्त एकच वकील पश्चिमेकडून उगवतो असं म्हणाले तर त्यात आत्मविश्वासाचा विषयच कुठे येतो?” अशा भाषेत सुधीर मुंगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.