Sariska Tiger Reserve: भारतातील सर्वात वृद्ध वाघिणीचा आजारामुळे मृत्यू

221
Sariska Tiger Reserve: भारतातील सर्वात वृद्ध वाघिणीचा आजारामुळे मृत्यू
Sariska Tiger Reserve: भारतातील सर्वात वृद्ध वाघिणीचा आजारामुळे मृत्यू

सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील (Sariska Tiger Reserve) सर्वात वृद्ध वाघिणीचा आजारपणामुळे मंगळवारी, (10 जानेवारी) मृत्यू झाला. या वाघिणीला सरिस्काची ST-2 ‘राजमाता’ म्हणून ओळखले जात होते. 2008 साली तिला सरिस्का येथे ठेवण्यात आले होते.

येथे तिने (ST-7, ST-8, ST-13, ST-14) 4 बछड्यांना जन्म दिला. गेल्या 2 वर्षांपासून तिच्या शेपटीला जखम झाल्यामुळे डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी (10 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता तिला मृत घोषित करण्यात आले. बुधवारी तिचे शवविच्छेदन करण्यात आले.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावर मुनगंटीवारांनी दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाले…)

जयपूरमधील एका अधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यावर त्यांनी सरिस्का नॅशनल पार्ककडे धाव घेतली. तेथील नियमावलीचे पालन करून सरिस्कामधील राजमातेवर अंत्यसंस्कार केले. ‘गेल्या २ वर्षांपासून तिच्यावर कडक नजर ठेवण्यात आली होती. डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते, कारण या काळात ती दोन-तीन वेळा गंभीररीत्या आजारी पडली होती, मात्र प्रगत उपचारांमुळे तिला वाचवण्यात यश आले होते, ‘ अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

ST-2 ही भारतातील पहिली मोठी वाघीण आहे, जिला सरिस्का अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत ठेवण्यात आले होते. 4 जुलै 2008 रोजी रणथंबोर नॅशनल पार्कमधून तिला येथे पाठवले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.