मुंबई महापालिकेच्या उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये यंदाही संगीत सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात शास्त्रीय कार्यक्रमाची संगीतमय सकाळ एन सी पी ए, बनायन ट्री, ट्रापा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी १४ जानेवारी २०२४ रोजी मुंबई ग्रीन रागा हा उपक्रम मुंबईतील १० उद्यानांमध्ये सकाळी ०७.०० ते ०९.०० या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. (BMC)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागातील उद्यानांमध्ये नागरिकांकरीता वाचनालय, नाविन्यपूर्ण संकल्पना आदी विविध प्रकारच्या संकल्पना राबविण्यात येतात तसेच लहान मुलांसाठी खेळाची साधन सामग्रीही उद्यानांमध्ये बसविण्यात आली आहे. यंदाही मुंबई ग्रीन रागा’ या शीर्षकांतर्गत महापालिकेच्या पुढाकाराने एन सी पी ए, बनायन ट्री, ट्रापा या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने येत्या १४ जानेवारी रोजी हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. (BMC)
सन २०१९ मध्ये सर्व प्रथम मुंबई ग्रीन रागा’ या शीर्षकांतर्गत भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यात उदयोन्मुख कलाकार सहभागी होत त्यांनी आपली गायकी सादर केली होती. मात्र पूर्वी १७ ते २० उद्यानातील खुल्या नाट्यगृहात होणारा हा कार्यक्रम यंदा १० उद्यानात होणार आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रभात रागांचे सूर, साथीला बासरी, संवादिनी, सितार, सरोद, व्हायोलिन या वाद्यांचे स्वर आणि जोडीला असणा-या ताल वाद्यांच्या साथीने येत्या रविवारची सकाळ अनेक मुंबईकरांसाठी आगळी वेगळी ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा व सोई-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. (BMC)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : शिंदे गट हीच खरी शिवसेना; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अंतिम निर्णय)
या उद्यानात रंगणार संगीताचा कार्यक्रम
- दहिसर पुर पूर्व मारुती मैदान
- कांदिवली ड्रीम पार्क गार्डन
- मालाड पश्चिम माईंड स्पेस गार्डन
- पवई हिरानंदानी गार्डन
- जुहू किशोर कुमार गार्डन
- सांताक्रुज पश्चिम लायन्स पार्क
- शिवाजी पार्क बाजीप्रभू उद्यान
- मलबार हिल कमला हिल उद्यान
- माझगाव सेंट जोसेफ बाप्टिस्ट उद्यान
- मुलुंड पूर्व सी. डी. देशमुख उद्यान (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community